ट्रायकीने पंचांना ‘मूर्ख’, जगातील सर्वात वाईट’ म्हटले

By Admin | Updated: July 1, 2016 19:55 IST2016-07-01T19:55:59+5:302016-07-01T19:55:59+5:30

सर्बियाचा व्हिक्टर ट्रायकी याने गुरुवारी विम्बल्डनच्या जुन्या टोमणेबाजीची आठवण ताजी करताना पंचांना ‘मूर्ख’ आणि ‘जगातील सर्वात’ वाईट असे म्हटले.

Trikey called the umpires "the fool, the world's worst" | ट्रायकीने पंचांना ‘मूर्ख’, जगातील सर्वात वाईट’ म्हटले

ट्रायकीने पंचांना ‘मूर्ख’, जगातील सर्वात वाईट’ म्हटले

dir="ltr">लंडन : सर्बियाचा व्हिक्टर ट्रायकी याने गुरुवारी विम्बल्डनच्या जुन्या टोमणेबाजीची आठवण ताजी करताना पंचांना ‘मूर्ख’ आणि ‘जगातील सर्वात’ वाईट असे म्हटले.
सर्बियाच्या २५ व्या मानांकित ट्रायकीला स्पेनच्या अल्बर्ट रामोस विनोलास याच्याविरुद्ध ३-६, ६-३, २-६, ६-३ असा पराभव पत्करावा लागला आणि यादरम्यान पंच डेमियानो टोरेला याला एक गुण देण्याच्या निर्णयामुळे त्याला मॅच पॉइंटचा सामना करावा लागला. स्पेनच्या रामोसची एक सर्व्हिस पंचांनी ‘आऊट’ ठरवली; परंतु त्यानंतर निर्णय बदलताना त्याला बिनतोड सर्व्हिस ठरवली. त्यामुळे कोर्ट १७ वर ट्रायकी नाराज झाला व तो पुढच्याच पॉइंटवर पराभूत झाला.
ट्रायकीने पंचांचा निर्णय बदलल्यानंतर म्हटले, ‘‘पाहा, पांढºया ठिकाणी काहीही लागलेले नाही पाहा. कृपा करून एकदा तरी पाहा. तुम्ही जगातील सर्वात वाईट पंच आहात.’’ त्यानंतर त्याने चेंडू कोर्टच्या बाहेर फेकून दिला. त्याच्या वर्तनामुळे त्याला आचारसंहितेच्या उल्लंघनाचा सामना करावा लागला.
पुढील पॉइंटवर सामना गमावल्यानंतर ट्रायकी पुन्हा म्हणाला, ‘‘तुम्ही वाईट होता, तुम्ही काय केले हे तुम्हाला माहीत आहे. तुम्ही आतापर्यंतचे सर्वात वाईट आणि मूर्ख आहात. तुम्ही जवळपास ३0 चुका केल्यात.’’

Web Title: Trikey called the umpires "the fool, the world's worst"