शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा
2
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
3
‘मोदींचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलंय, भाजपानं त्यांच्यावर…’, संजय राऊतांची बोचरी टीका 
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे खर्च करतात आपला पगार?; मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली माहिती
5
३ दहशतवादी ठार, ४० तास चालली चकमक; लष्कराची मोठी कारवाई
6
'लोकसभेवेळी सर्वांचं आय लव्ह यू असतं. मात्र विधानसभेवेळी...', गुलाबराव पाटील यांचं सूचक विधान, रोख कुणाकडे, चर्चांना उधाण
7
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
9
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...
10
राजकारण तापले उद्धव सेनेच्या जिल्हाप्रमुख बडगुजर यांना हद्दपारची नोटीस
11
प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन काळाच्या पडद्याआड, रितेश देशमुख - श्रेयस तळपदेने वाहिली श्रद्धांजली
12
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
13
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
14
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचं सत्र सुरूच; Hero Motocorp मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला
15
सोनालीच्या जगण्याची होती ३० टक्के शक्यता; मृत्युच्या दारातून परतलेल्या अभिनेत्रीने सांगितला कॅन्सरचा प्रवास
16
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
17
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
18
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
19
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
20
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...

शालेय क्रीडा प्रकारात एकूण ५१ विविध क्रीडाप्रकारांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 5:51 AM

भारतीय खेळ महासंघाने यंदाच्या वर्षात नवीन सहा खेळ प्रकारांना मान्यता दिली असून, त्यात पूर्वीचा आट्यापाट्या खेळासह सेपक टाकरा, रब्बी, टेनीक्वाईट, मॉडर्न पेंटथलॉन, सॉफ्ट टेनिस या खेळांचा समावेश शालेय क्रीडा प्रकारात झाला आहे.

- सचिन भोसलेकोल्हापूर -  भारतीय खेळ महासंघाने यंदाच्या वर्षात नवीन सहा खेळ प्रकारांना मान्यता दिली असून, त्यात पूर्वीचा आट्यापाट्या खेळासह सेपक टाकरा, रब्बी, टेनीक्वाईट, मॉडर्न पेंटथलॉन, सॉफ्ट टेनिस या खेळांचा समावेश शालेय क्रीडा प्रकारात झाला आहे. त्यामुळे शालेय क्रीडा प्रकारांची आता एकूण संख्या ५१ इतकी झाली आहे.विविध खेळांत अनेक भारतीय खेळाडूंनी जगभरात देशाचा नावलौकिक करावा. त्यातून खेळ आणि आरोग्य उत्तम राहावे. देशाची पिढी सुदृढ व्हावी. याकरिता केंद्र शासनाच्या भारतीय खेळ महासंघाने देशी खेळांसह परदेशी खेळांचाही यंदापासूनच्या शैक्षणिक वर्षात केला आहे. यात विशेष म्हणजे आट्यापाट्या हा खेळ बहुतेक मुलांच्या विस्मरणात गेला होता. त्यास पुनरुज्जीवन मिळावे म्हणून भारतीय खेल महासंघाने त्याचा पुन्हा शालेय क्रीडा प्रकारात समावेश केला आहे. यासह सेपक टाकरा, रब्बी, टेनीक्वाईट, मॉडर्न पेंटथलॉन या विदेशी खेळाचाही समावेश केला आहे.यासंबंधीचे प्रशिक्षण क्रीडा शिक्षकांना गेल्या महिनाभर राज्या-राज्यातील क्रीडा व युवक सेवा संचलनालये करीत आहेत. कोल्हापुरातही अशा प्रकारची कार्यशाळा नुकतीच जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे घेण्यात आली. यात या खेळांचे आंतरराष्ट्रीय नियम, खेळाडूंची संख्या, मैदान, रिंग, आदींची तांत्रिक माहिती तज्ज्ञांकडून देण्यात आली.नव्या व जुन्या खेळांची सांगड घालून चांगली सुदृढ पिढी घडावी. त्यातून चांगले खेळाडू राष्ट्राला मिळावेत. या उद्देशाने भारतीय खेळ महासंघ व राज्य क्रीडा व युवा संचलनालयाने नव्या सहा खेळांचा यंदापासून समावेश केला आहे.- चंद्रशेखर साखरे,जिल्हा क्रीडाधिकारी, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरnewsबातम्या