टॉपर मुंबईचा सामना फिनिशरसोबत

By Admin | Updated: April 24, 2017 13:31 IST2017-04-24T13:24:36+5:302017-04-24T13:31:53+5:30

आयपीएल १० च्या गुणतक्त्यात टॉपर असलेल्या मुंबई इंडियन्सचा सामना आज रात्री ८ वाजता रायजिंग पुणे सुपर जायंट्स विरोधात आहे

Topper Mumbai finisher with a match | टॉपर मुंबईचा सामना फिनिशरसोबत

टॉपर मुंबईचा सामना फिनिशरसोबत

- आकाश नेवे / आॅनलाइन लोकमत
आयपीएल १० च्या गुणतक्त्यात टॉपर असलेल्या मुंबई इंडियन्सचा सामना आज रात्री ८ वाजता रायजिंग पुणे सुपर जायंट्स विरोधात आहे. मुंबईने या सत्रात अत्यंत आक्रमक आणि यशस्वी खेळ केलेला असला, तरी या सत्रात त्यांनी पुणेविरोधात झालेला पहिला सामना गमावला आहे.
धोनीला गवसलेला सूर हे पुणे संघाचे बलस्थान आहे. राहुल त्रिपाठीची फटकेबाजी पुणे संघाला मोठी धावसंख्या उभारण्यासाठी नक्कीच मदत करेल. कर्णधार स्टिव्ह स्मिथ एकदा खेळपट्टीवर स्थिरावला, तर तो काय करूशकतो, याचा अंदाज मुंबईला पहिल्या सामन्यात आलाच असेल. या सामन्यात स्मिथने षटकार मारून पुण्याला विजय मिळवून दिला होता, तर इम्रान ताहीरने या सामन्यात मुंबईची फिरकी घेतली होती. वानखेडे स्टेडियम हे शार्दुल ठाकूरचे होमग्राउंड आहे, त्यामुळे त्याचा फायदा तो नक्कीच घेईल.

Web Title: Topper Mumbai finisher with a match