किंग्स इलेव्हनच्या सराव शिबिरात अव्वल खेळाडू
By Admin | Updated: September 11, 2014 22:31 IST2014-09-11T22:31:28+5:302014-09-11T22:31:28+5:30

किंग्स इलेव्हनच्या सराव शिबिरात अव्वल खेळाडू
>चंदीगढ: किंग्स इलेव्हन पंजाब आगामी चॅम्पियन्स लीग टूर्नामेंटसाठी उद्यापासून पीसीए स्टेडियम मोहालीमध्ये सराव शिबिराचे आयोजन केले आह़े यामध्ये जॉर्ज बेली, वीरेंद्र सेहवाग, डेव्हिड मिलर, ग्लेन मॅक्सवेल आणि मिशेल जॉनसारख्या अव्वल खेळाडूंशिवाय अक्षर पटेल, ऋषी धवन, करणवीर सिंग, तिसरा परेरा, लक्ष्मीपती बालाजी, परविंदर अवाना, मनन वोहरा, रिद्धीमान साहा, अनुरित सिंग आणि मनदीप सिंगदेखील सहभाग नोंदविणार आह़े कोच संजय बांगर, गोलंदाजी कोच जो डावेस आणि क्षेत्ररक्षण कोच आऱर्शीधर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर भरविण्यात येणार असल्याचे किंग्स इलेव्हन पंजाबचे सीओओ फ्रेजर कास्टेलिनो यांनी सांगितल़े