शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Tokyo Olympics: कुस्ती: बजरंग, विनेशकडून अपेक्षा, रवी दहिया देखील दावेदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 06:34 IST

Wrestling, Tokyo Olympics: भारताचे सात मल्ल टोकियो ऑलिम्पिकच्या कुस्तीत पदकासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असून बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांच्या कामगिरीवर विशेष लक्ष असेल.

टोकियो : भारताचे सात मल्ल टोकियो ऑलिम्पिकच्या कुस्तीत पदकासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असून बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांच्या कामगिरीवर विशेष लक्ष असेल. दोघांनी अलिकडे शानदार कामगिरी केल्यामुळे देशासाठी पदके जिंकू शकतात. आज मंगळवारी सोनम मलिकच्या लढतीद्वारे भारतीय आव्हानाला सुरुवात होईल. मल्लांनी येथे तीन पदके न जिंकल्यास भारताची खराब कामगिरी मानली जाईल.बजरंग ६५ किलो फ्रीस्टाईल, विनेश ५३ किलो आणि रवी दहिया ५७ किलो प्रकारात लढत देणार आहे. १९ वर्षांची सोनम ६२ किलो गटात आव्हान सादर करेल. तिच्यापुढे आशियाई चॅम्पियनशिपची रौप्य विजेती मंगोलियाची बोलोरतुया खुरेलखूचे आव्हान असेल. दोघीही नवख्या खेळाडू असल्याने एकमेकींच्या डावपेचांची माहिती नाही.विनेशच्या गटात अनेक दिग्गज खेळाडू आहेत. विनेशचा बचाव आणि प्रतिहल्ला करण्याचे कौशल्य यामुळे ती प्रतिस्पर्धी खेळाडूंवर विजय नोंदविण्यास सक्षम वाटते. बजरंग हा विश्व स्तरावरील सन्मानित मल्ल आहे. मागच्या दहा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्याने सहा सुवर्ण, तीन रौप्य व एक कांस्य अशी कामगिरी केली. त्याचा दमखम चांगला आहे. पण लढताना पायाचा बचाव करणे हे मोठे आव्हान असेल.रवी दहिया हा देखील तांत्रिकदृष्ट्या सक्षम मल्ल आहे. त्याला रशिया आणि तुर्कस्थानच्या मल्लांकडून आव्हान असेल. ८६ किलो फ्री स्टाईलमध्ये दीपक पुनिया देखील आव्हान सादर करणार असला तरी त्याची तयारी अर्धवट जाणवते. 

टॅग्स :Vinesh Phogatविनेश फोगटWrestlingकुस्तीindia at olympics 2021भारत ऑलिंपिक 2021