शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

Tokyo Olympics: लवलीना ऐतिहासिक कामगिरीसाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 07:04 IST

Lovlina Borgohain: भारतीय महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेन ही ६९ किलो गटात पहिल्या ऑलिम्पिक पदकासाठी आज बुधवारी तुर्कस्थानची सध्याची विश्वविजेती बुसेनाज सूरमेनेलीविरुद्ध  विजय नोंदविण्याच्या निर्धाराने रिंगणात उतरणार आहे.

टोकियो : भारतीय महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेन ही ६९ किलो गटात पहिल्या ऑलिम्पिक पदकासाठी आज बुधवारी तुर्कस्थानची सध्याची विश्वविजेती बुसेनाज सूरमेनेलीविरुद्ध  विजय नोंदविण्याच्या निर्धाराने रिंगणात उतरणार आहे. लवलीनाने उपांत्यफेरीचा अडथळा पार केल्यास अंतिम फेरी गाठणारी ती पहिली भारतीय बॉक्सर ठरेल. विजेंदरसिंग याने २००८ला कांस्य आणि त्यानंतर एम. सी. मेरीकोमने २०१२ला या खेळात कांस्य जिंकले होते. लवलीनाचे पदक हे भारतीय बॉक्सरचे गेल्या नऊ वर्षांतील पहिलेच पदक असेल. 

तेजिंदर, अनुराणी, सोनम पराभूतटोकियो: ऑलिम्पिकचा मंगळवारचा दिवस भारतासाठी फारच निराशादायी ठरला.  भारताचा पुरुष हॉकी संघ उपांत्य फेरीच्या सामन्यात बेल्यियमकडून पराभूत झाल्यानंतर मैदानी स्पर्धेच्या भालाफेकीत अनुराणी पात्रता फेरीत १४ व्या तर गोळाफेकपटू तेजिंदर पालसिंग तूर १३ व्या स्थानी राहिला. महिला कुस्तीत सोनम मलिक देखील पदार्पणाच्या पहिल्या लढतीत ६२ किलो फ्रीस्टाईल प्रकारात पराभवासह बाहेर पडली.तेजिंदरने पहिल्या प्रयत्नात १९.९९ मीटर गोळा फेकला. त्याचा दुसरा आणि तिसरा प्रयत्न अपयशी ठरला. दोन्ही गटातील आघाडीचे १२ खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार असल्याने पदकाच्या शर्यतीतून बाद झाला.भालाफेकपटू अनुराणी ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकली नाही. मंगळवारी ५४.०४ मीटर फेक करीत अनू अ गटात १४ व्या स्थानी राहिली.१४ खेळाडूंमध्ये अनूने ५०.३५ मीटरसह सुरुवात केली. दुसऱ्या प्रयत्नांत ५३.१९ मीटरचे अंतर गाठले. 

टॅग्स :Lovelina Borgohainलव्हलीना बोरगोहाईंboxingबॉक्सिंगindia at olympics 2021भारत ऑलिंपिक 2021