शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Tokyo Olympics: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कौतुकासाठी फोन अन् महिला हॉकीपटूंच्या डोळ्यांत दाटून आले अश्रू, Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 14:50 IST

Tokyo Olympics :  टोकियो ऑलिम्पिकमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला संघाचे पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे.

Tokyo Olympics :  टोकियो ऑलिम्पिकमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला संघाचे पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. ग्रेट ब्रिटनविरुद्ध झालेल्या अत्यंत अटीतटीच्या लढतीत भारतीय महिला संघाला ३-४ अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. या सामन्यात ०-२ ने पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय संघाने ३-२ अशी आघाडी घेतली होती. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये प्रत्येकी एक गोल करत ग्रेट ब्रिटनने हा सामना ४-३ असा फरकाने जिंकला आणि कांस्यपदकावर कब्जा केला. भारतीय महिला हॉकी संघाची ऑलिम्पिक स्पर्धेतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः फोन करून महिला खेळाडूंशी संवाद साधला अन् त्यांचे कौतुक केले. 

मोदींनी भारतीय महिला हॉकी संघातील खेळाडूंचे मनोबल उंचावले आणि त्यांच्या लढाऊ वृत्तीचं कौतुक केलं. मोदींचे हे कौतुकास्पद बोल ऐकून खेळाडू इमोशनल झाले अन् त्यांच्या डोळ्यांत पाणी दाटून आले. मोदी म्हणाले की,पदक आणण्यात तुम्ही अपयशी ठरला असाल तरी तुम्ही मैदानावर गाळलेला घाम हा देशातील कोट्यवधी मुलींसाठी प्रेरणा देणारा ठरला आहे. संघातील प्रत्येक खेळाडू आणि प्रशिक्षकाचे मी अभिनंदन करतो.''   यावेळी पंतप्रधानांनी नवनीत कौर हिला झालेल्या दुखापतीचीही माहिती घेतली. नवनीतच्या डोळ्याच्या वर दुखापत झाली आणि तिला चार टाके पडले आहेत. मोदी म्हणाले,''तुम्ही निराश होऊ नका, देशाला तुमचा अभिमान आहे. तुमच्या मेहनतीमुळे देशात पुन्हा हॉकीचे पुनर्जीवन झाले आहे.''    

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021HockeyहॉकीNarendra Modiनरेंद्र मोदी