शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Tokyo Olympics: ऑलिम्पिकमध्ये उद्या महामुकाबला, भारत-पाकिस्तान येणार आमने-सामने; ही आहे स्पर्धेची वेळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 13:58 IST

Tokyo Olympics Live Updates: शनिवारी होणाऱ्या भालाफेकीच्या अंतिम लढतीमधून भारताला सुवर्णपदकाची अपेक्षा असेल. मात्र भारताच्या या सुवर्ण मोहिमेत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून कडवी टक्क मिळण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देशनिवारी होणाऱ्या भालाफेकीच्या अंतिम फेरीमध्ये भारताचा नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम आमने सामने येणार आहेतपुरषांच्या भालाफेकीमध्ये भारताच्या नीरज चोप्राने अपेक्षित कामगिरी करताना पहिल्याच प्रयत्नात थेट अंतिम फेरी गाठली होती पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम याने पात्रता फेरीच्या ब गटात ८५.१६ मीटर भाला फेक करत अव्वल स्थान पटकावले होते

टोकियो - जपानची राजधानी टोकियो येथे गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय क्रीडापटूंची कामगिरी समाधानकारक झाली आहे. स्पर्धेत भारताने आतापर्यंत दोन रौप्य आणि तीन कांस्य पदकांसह एकूण पाच पदके जिंकली आहेत. (india at olympics 2021) दरम्यान, शनिवारी होणाऱ्या भालाफेकीच्या अंतिम फेरीमधून भारताला सुवर्णपदकाची अपेक्षा असेल. मात्र भारताच्या या सुवर्ण मोहिमेत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून कडवी टक्क मिळण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे उद्या होणाऱ्या भालाफेकीच्या अंतिम फेरीमध्ये भारताचा नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम आमने सामने येणार आहेत. (neeraj chopra vs arshad nadeem) ऑलिम्पिकमधील भालाफेकीच्या अंतिम लढतीला शनिवारी संध्याकाळी ४.३० पासून सुरुवात होईल. (India-Pakistan to face each other in javelin throw in Olympics tomorrow)

पुरषांच्या भालाफेकीमध्ये भारताच्या नीरज चोप्राने अपेक्षित कामगिरी करताना पहिल्याच प्रयत्नात थेट अंतिम फेरी गाठली. विशेष म्हणजे अंतिम फेरीसाठी झालेल्या पात्रता फेरीत त्याची कामगिरी सर्वोत्तम ठरली होती. त्याने ८६.६५ मीटरची जबरदस्त भाला फेक केली होती. दरम्यान, पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम याने पात्रता फेरीच्या ब गटात ८५.१६ मीटर भाला फेक करत अव्वल स्थान पटकावले होते. मात्र अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या १२ खेळाडूंमध्ये तो तिसऱ्या स्थानी राहिला होता. जर्मनीचा अव्वल भालाफेकपटू आणि सुवर्ण पदकाचा प्रबळ दावेदार जर्मनीच्या योहानेस वेटेर याने ८५.६५ मीटर लांब भाला फेक केली होती. तो दुसऱ्या स्थानावर राहिला होता. दरम्यान अंतिम लढतीत या आघाडीच्या तीन खेळाडूंनी इतर भालाफेकपटूंकडूनही कडवी टक्कर मिळण्याची शक्यता आहे. मात्र मुख्य आकर्षण हे भारताचा नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम यांच्यातील जुगलबंदी हेच असणार आहे.

आता अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताच्या पदकाचा एकमेव दावेदार असलेल्या नीरज चोप्रा याने आपल्या कामगिरीबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले होते की, मी ऑलिम्पिक स्पर्धेत चांगले अनुभव घेत आहे. सरावादरम्यान माझी कामगिरी चांगली झाली नव्हती, मात्र प्रत्यक्ष स्पर्धेत मी चांगली लय मिळवली आणि अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरलो. पहिल्यांदाच ऑलिम्पिक खेळत असल्याने हा अनुभव वेगळा ठरेल. शारीरिकदृष्ट्या सर्वजण कठोर मेहनत घेतात, पण आता मानसिकरीत्याही सज्ज रहावे लागेल. मला जास्तीत जास्त अंतर पार करायचे आहे.

दुसरीकडे पाकिस्तानची ऑलिम्पिकमधील कामगिरी निराशाजनक झाली आहे. त्यांचे मोजके क्रीडापटूच स्पर्धेसाठी पात्र ठरले होते. त्यातही त्यांना या ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत एकही पदक जिंकला आलेले नाही. मात्र अर्शद नदीमकडून पाकिस्तानला पदकाची अपेक्षा असेल.  

टॅग्स :india at olympics 2021भारत ऑलिंपिक 2021India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानNeeraj Chopraनीरज चोप्रा