शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

Tokyo Olympic : भारतीय पुरूष हॉकी संघातील पंजाबच्या खेळाडूंना सरकार देणार प्रत्येकी एक कोटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 16:03 IST

Tokyo Olympic 2020 : भारतीय पुरुष हॉकी संघानं गुरुवारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत इतिहास घडवला. १९८०नंतर भारतीय संघानं ऑलिम्पिक स्पर्धेचे पदक जिंकले.

Tokyo Olympic 2020 : भारतीय पुरुष हॉकी संघानं गुरुवारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत इतिहास घडवला. १९८०नंतर भारतीय संघानं ऑलिम्पिक स्पर्धेचे पदक जिंकले. भारतानं कांस्यपदकांच्या लढतीत जर्मनीवर ५-४ असा थरारक विजय मिळवून कांस्यपदक जिंकले अन् ४१ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला. सिमरनजीत सिंगचे दोन गोल अन् रुपिंदरपाल सिंग, हरमनप्रीत सिंग व हार्दिक सिंग यांनी प्रत्येकी एक गोल करून पिछाडीवरून मुसंडी मारली. भारताला हा ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या संघातील पंजाबच्या खेळाडूंना प्रत्येकी  १ कोटी बक्षीस देण्याचे पंजाबचे क्रीडा मंत्री राणा गुरमीत सिंग सोढी यांनी जाहीर केले.

Tokyo Olympic : जेव्हा एकटी, कोपऱ्यात उभी होती टीम इंडिया, तेव्हा गपचूप येऊन पकडला हात; त्यामुळेच आज घडला इतिहास!

''या ऐतिहासिक क्षणी मला हे सांगण्यास आनंद होत आहे की भारतीय संघातील पंजाबच्या खेळाडूंना प्रत्येकी एक कोटी रुपये राज्य सरकारकडून देण्यात येणार आहेत. आम्ही त्यांचे जंगी स्वागत करण्यासाठी सज्ज आहोत,'' सोढी यांनी ट्विट केलं. कर्णधार मनप्रीत सिंग याच्यासह पंजाबचे आठ खेळाडू भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. यामध्ये हरमनप्रीत सिंग, रुपिंदरपाल सिंग, हार्दिक सिंग, शमशेर सिंग, दिलप्रीत सिंग, गुरजंत सिंग आणि मनदीप सिंग यांचा समावेश आहे. भारतीय संघानं उपांत्य फेरीत प्रवेश केला, तेव्हा जर संघानं सुवर्णपदक जिंकल्यास पंजाबच्या खेळाडूंना प्रत्येकी २.२५ कोटी देण्याचे जाहीर केले होते. 

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021PunjabपंजाबHockeyहॉकी