शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

Tokyo Olympic : टीम इंडियानं हॉकीत ऑलिम्पिक गोल्ड जिंकल्यास, पंजाबच्या खेळाडूंना मिळणार प्रत्येकी २.२५ कोटी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 7:16 PM

Tokyo Olympic : भारतीय पुरुष हॉकी संघानं शुक्रवारी यजमान जपानला पराभूत करून अ गटात १२ गुणांसह दुसरे स्थान पक्के केले.

Tokyo Olympic : भारतीय पुरुष हॉकी संघानं शुक्रवारी यजमान जपानला पराभूत करून अ गटात १२ गुणांसह दुसरे स्थान पक्के केले. ४१ वर्षांनंतर टीम इंडियानं प्रथमच साखळी फेरीत चार विजय मिळवण्याचा पराक्रम करून दाखवला. ऑस्ट्रेलियाकडून दारूण पराभव पत्करावा लागल्यानंतर टीम इंडियानं जबरदस्त कमबॅक केले आणि सलग तीन विजयांची नोंद केली. आजच्या अखेरच्या साखळी सामन्यात त्यांनी जपानवर ५-३ असा दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय पुरुष संघ ४१ वर्षांचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवणार अशा आशा निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आता पंजाबचे क्रीडा मंत्री राणा गुरमीत सिंगा सोढी यांनी मोठी घोषणा केली. हॉकीत गोल्ड मेडल जिंकल्या, पंजाबच्या खेळाडूंना प्रत्येकी २.२५ कोटी देण्यात येणार असल्याची घोषणा क्रीडा मंत्री राणा गुरप्रीत सिंग यांनी केली. भारतीय संघात पंजाबच्या २० खेळाडूंचा समावेश आहे आणि त्यापैकी ११ खेळाडू मैदानावर दमदार कामगिरी करत आहेत. १९८०साली भारतीय पुरूष हॉकी संघानं ऑलिम्पिकमध्ये अखेरचं गोल्ड मेडल जिंकलं होतं. ( On winning Olympic gold, Punjab hockey players to get Rs 2.25 crore each: Sports Minister) जपानविरुद्धच्या आजच्या सामन्यात पहिल्या सत्रात १३व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगनं पेनल्टी कॉर्नवर गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर १७व्या मिनिटाला गुरजंत सिंगनं मैदानी गोल केला. जपानकडून १९व्या मिनिटाला पहिला गोल आला तो केंटो तनाकाच्या स्टीक्समधून. दुसऱ्या सामन्यात जपानकडून कोटा वॅटानाबेनं ( ३३ मि.) गोल करताना बरोबरीचा आनंद साजरा केला, परंतु तो पुढच्याच मिनिटाला मावळला. समशेर सिंगनं पुढच्याच मिनिटाला अप्रतिम मैदानी गोल करून भारताला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली.  

५१व्या मिनिटाला निळकंट शर्मानं मैदानी गोल करून भारताची आघाडी ४-२ अशी मजबूत केली. त्यानंतर कॉर्नरवर हरमनप्रीत सिंगच्या स्टीक्समधून आलेल्या चेंडूला गुरजंत सिंगन दिशा दाखवून ५-२ अशी दमदार आघाडी घेतली. गुरजंतचा हा सामन्यातील दुसरा गोल ठरला. ५९व्या मिनिटाला जपानकडून काजुमा मुराटानं गोल कडून पिछाडी ३-५ अशी कमी केली.  

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021PunjabपंजाबHockeyहॉकी