संभाव्य ‘टीम इंडिया’ची आज निवड
By Admin | Updated: December 4, 2014 01:50 IST2014-12-04T01:50:37+5:302014-12-04T01:50:37+5:30
आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये होणा-या आगामी वन-डे वर्ल्डकपसाठी गुरुवारी भारतीय संभाव्य संघ जाहीर करण्यात येईल़

संभाव्य ‘टीम इंडिया’ची आज निवड
मुंबई : आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये होणा-या आगामी वन-डे वर्ल्डकपसाठी गुरुवारी भारतीय संभाव्य संघ जाहीर करण्यात येईल़ संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील ५ सदस्यीय निवड समिती या स्पर्धेसाठी ३० संभावित खेळाडू निवडणार आहेत़
२०११ च्या वर्ल्डकप विजेत्या भारतीय टीमचे सदस्य राहिलेले युवराज सिंह, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, हरभजनसिंह आणि आशिष नेहरा सध्या आपल्या खराब फॉर्मशी झगडत आहेत. त्यामुळे या खेळाडूंची संभाव्य संघात वर्णी लागते किंवा नाही, याबद्दल क्रीडापे्रमींमध्ये उत्सुकता आहे़ निवडकर्ते वन-डे वर्ल्डकपसाठी ७ जानेवारी रोजी अंतिम संघ निवडणार आहेत. हा संघ १४ फेब्रुवारी ते २९ मार्च दरम्यान होणाऱ्या वन-डे वर्ल्डकपमध्ये खेळेल़ दिल्लीच्या गौतम गंभीरने २०११च्या वर्ल्डकपमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती़ मात्र, सध्या हा खेळाडू आऊट आॅफ फॉर्म आहे़ त्यामुळे त्याच्या नावाचा विचार होणे कठीण वाटत आहे़ (वृत्तसंस्था)