क्रीडादिनानिमित्त आज खेळाडूंचा गौरव
By Admin | Updated: August 28, 2014 21:03 IST2014-08-28T21:03:08+5:302014-08-28T21:03:08+5:30
नाशिक : राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त क्रीडा साधना संस्थेच्या वतीने राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक प्राप्त केलेल्या खेळाडूंना उद्या गौरविले जाणार आहे. कालिका मंदिर ट्रस्टच्या सभागृहात सायंकाळी ५ वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानित केले जाणार आहे. यावेळी सहाय्यक क्रीडा संचालक रवि नाईक, केशव पाटील, उपसंचालक जगन्नाथ अधाणे, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस, दत्ता पाटील, अशोक दुधारे, आनंद खरे आदि उपस्थित राहणार आहेत. यावेळी खेळाडूंसह मुख्य मार्गदर्शक विक्रम दुधारे, राजू शिंदे, किरण घोलप, मकरंद देव, शशांक वझे यांनाही सन्मानित केले जाणार आहे. तरी क्रीडाप्रेमींनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन क्रीडा साधनातर्फे करण्यात आले आहे.

क्रीडादिनानिमित्त आज खेळाडूंचा गौरव
न शिक : राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त क्रीडा साधना संस्थेच्या वतीने राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक प्राप्त केलेल्या खेळाडूंना उद्या गौरविले जाणार आहे. कालिका मंदिर ट्रस्टच्या सभागृहात सायंकाळी ५ वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानित केले जाणार आहे. यावेळी सहाय्यक क्रीडा संचालक रवि नाईक, केशव पाटील, उपसंचालक जगन्नाथ अधाणे, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस, दत्ता पाटील, अशोक दुधारे, आनंद खरे आदि उपस्थित राहणार आहेत. यावेळी खेळाडूंसह मुख्य मार्गदर्शक विक्रम दुधारे, राजू शिंदे, किरण घोलप, मकरंद देव, शशांक वझे यांनाही सन्मानित केले जाणार आहे. तरी क्रीडाप्रेमींनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन क्रीडा साधनातर्फे करण्यात आले आहे.