शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

CWG 2022 Last Day Schedule:राष्ट्रकुल स्पर्धेचा आज शेवटचा दिवस! सिंधू-लक्ष्यच्या खेळीवर तमाम भारतीयांच्या नजरा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 11:14 IST

राष्ट्रकुल स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारताचे एकूण ६ सामने होणार आहेत. 

बर्गिंहॅम : इंग्लंडमध्ये सुरू असलेली २२ वी राष्ट्रकुल स्पर्धा आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचली आहे. आज सोमवारच्या दिवशी या स्पर्धेचा शेवट होणार आहे. आजच्या शेवटच्या दिवशी भारतीय खेळाडूंना ५ सुवर्ण आणि एक कांस्य पदक जिंकण्याची सुवर्णसंधी असेल. भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूच्या खेळीवर तमाम भारतीयांच्या नजरा असणार आहेत.

दरम्यान, भारताचे बॅडमिंटन खेळाडू भारतासाठी शेवटच्या दिवशी ३ सुवर्ण जिंकू शकतात. महिला एकेरीत पी.व्ही सिंधू आणि पुरूष एकेरीत लक्ष्य सेन यांचा फायनलचा सामना होणार आहे. याशिवाय पुरूष दुहेरीत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी पदकासाठी अंतिम फेरीत उतरतील. संध्याकाळी हॉकीमध्ये पहिल्यांदाच पदक जिंकण्यासाठी भारतीय पुरूष हॉकी संघ अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरूद्ध मैदानात उतरेल. ऑस्ट्रेलियाने हॉकीमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत आतापर्यंत ६ सुवर्ण पदक जिंकली आहेत. 

बॅडमिंटन - महिला एकेरी सुवर्ण पदकाचा सामना - पी.व्ही सिंधू - दुपारी १.२० वाजल्यापासूनपुरूष एकेरी सुवर्ण पदकाचा सामना - लक्ष्य सेन - दुपारी २.१० वाजल्यापासूनपुरूष दुहेरी सुवर्ण पदकाचा सामना - सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी - दुपारी ३ वाजल्यापासून

टेबल टेनिस - पुरूष एकेरी कांस्य पदकाचा सामना - जी साथियान - दुपारी ३.३५ वाजल्यापासूनपुरूष एकेरी सुवर्ण पदकाचा सामना - अचंता शरत कमल - दुपारी ४.२५ वाजल्यापासून 

हॉकी -भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया - पुरूष हॉकी फायनल - संध्याकाळी ५ वाजल्यापासून  

भारताच्या खात्यात १८ सुवर्ण 

राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ च्या दहाव्या दिवशी (रविवारी) भारतीय खेळाडूंनी तब्बल १५ पदके जिंकून स्पर्धेत पदकांचे अर्धशतक ठोकले. दहाव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी आपली प्रतिभा दाखवून एकूण १५ पदक पटकावली, ज्यामध्ये ५ सुवर्ण, ४ रौप्य आणि ५ कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताने आतापर्यंत या स्पर्धेत एकूण ५५ पदक जिंकली आहेत.  सर्वाधिक पदक जिंकण्याच्या यादीत भारत सध्या पाचव्या क्रमांकावर स्थित आहे. ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक १७४ पदक जिंकून पहिले स्थान पटकावले आहे. तर यजमान इंग्लंड १६६ पदकांसह दुसऱ्या आणि कॅनाडा ९१ पदकांसह तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे. न्यूझीलंडने एकूण ४८ पदके जिंकली आहेत मात्र त्यांनी भारतापेक्षा एक सुवर्ण जास्त जिंकल्याने ते यादीत भारतापेक्षा एक पाऊल पुढे आहेत. भारताने आतापर्यंत १८ सुवर्ण, १५ रौप्य आणि २२ कांस्य पदक अशी एकूण ५५ पदके जिंकली आहेत. 

 

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाIndiaभारतPV Sindhuपी. व्ही. सिंधूBadmintonBadmintonHockeyहॉकीTable Tennisटेबल टेनिसSilverचांदीGold medalसुवर्ण पदक