चेल्सी विक्रमाच्या उंबरठ्यावर
By Admin | Updated: December 5, 2014 23:49 IST2014-12-05T23:49:02+5:302014-12-05T23:49:02+5:30
गुणतक्त्यात अग्रस्थानी असणा-या चेल्सी आणि मँचेस्टर सिटी यांच्यात केवळ सहा गुणांचा फरक राहिला आहे.

चेल्सी विक्रमाच्या उंबरठ्यावर
केदार लेले, लंडन
गुणतक्त्यात अग्रस्थानी असणा-या चेल्सी आणि मँचेस्टर सिटी यांच्यात केवळ सहा गुणांचा फरक राहिला आहे. चेल्सीचा संघ न्यूकॅसल विरुद्ध, तर मँचेस्टर सिटीचा संघ एव्हर्टन विरुद्ध दोन हात करेल. यंदाच्या हंगामात १५ लढतीत आणि गेल्या २३ लढतींमध्ये पराभव न चाखलेल्या चेल्सी संघाने न्यूकॅसल विरुद्धच्या लढतीत बरोबरी किंवा विजय मिळवल्यास तो एक विक्रम ठरेल.
बुधवारी झालेल्या लढतीत चेल्सी संघाचा ‘पॉवर हाऊस’ङ्कमानला जाणारा नेमजा मॅटिक जखमी झाला आहे. याच लढतीमध्ये पाच वेळेस पिवळे कार्ड मिळाल्यामुळे स्टार स्ट्रायकर कॉस्टाला खेळता आले नव्हते. उद्या, शनिवारी पुनरागमन करणाऱ्या गोलङ्कमशीन दिएगो कॉस्टावर चेल्सीची भिस्त असेल.
चेल्सी आणिङ्कमँचेस्टर सिटीप्रमाणेच आर्सनल आणि लिव्हरपूल संघसुद्धा तीन गुण वसूल करण्यासाठी उत्सुक आहेत. म्हणूनच आर्सनल विरुद्ध स्टोक आणि लिव्हरपूल विरुद्ध संडरलँड यांच्यातील लढतीसुद्धा तितक्याच रंगतदार ठरतील.