आयसीसी बैठकीसाठी तिघांना परवानगी
By Admin | Updated: February 2, 2017 00:09 IST2017-02-02T00:09:22+5:302017-02-02T00:09:22+5:30
दुबईत उद्या (गुरुवारी) होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) बैठकीत बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तीन व्यक्तींना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी परवानगी

आयसीसी बैठकीसाठी तिघांना परवानगी
नवी दिल्ली : दुबईत उद्या (गुरुवारी) होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) बैठकीत बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तीन व्यक्तींना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी परवानगी बहाल केली. या सर्वांचा दर्जा मात्र सारखाच असेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्या. दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या पीठाने या संदर्भात निर्देश देताना विक्रम लिमये, अनिरुद्ध चौधरी आणि अमिताभ चौधरी यांना आयसीसी बैठकीत सहभागी
होण्याची परवानगी असून, तिघांचा दर्जा एकच असेल. बीसीसीआयने आयसीसीला प्रतिनिधींची नावे सूचित करावीत.
तमिळनाडू क्रिकेट संघटनेचे वकील श्याम दिवाण यांनी सकाळी ६ वाजता मिळालेल्या संदेशानुसार केवळ लिमये हेच आयसीसी बैठकीला जातील व अन्य दोन नावे मागे घेण्यात आल्याची माहिती कोेर्टापुढे सादर करताच न्यायालयाने वरील आदेश दिले.
न्यायालयाने आधी ३० जानेवारीच्या आदेशात दुबईत
२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीसाठी विक्रम लिमये, अमिताभ चौधरी आणि अनिरुद्ध चौधरी
यांना बीसीसीआयचे प्रतिनिधी म्हणून अधिकृत केले होते. (वृत्तसंस्था)
आयसीसीची मान्यता
न्यायालय मित्र, ज्येष्ठ विधिज्ञ गोपाल सुब्रमण्यम म्हणाले, ‘‘प्रशासकांच्या समितीने अध्यक्ष शशांक मनोहर यांना आयसीसी बैठकीत बीसीसीआयच्या तीन प्रतिनिधींंना हजर राहू देण्याची विनंती केली. आयसीसीच्या नियमानुसार एका बोर्डाचा एकच सदस्य बैठकीत हजर राहू शकतो. मनोहर यांनी ही विनंती मान्य करून सकाळी ९ वाजता बीसीसीआयला ई-मेल पाठविला. त्यात तिन्ही सदस्यांना उपस्थित राहता येईल व त्यांच्या विमान तिकिटांची व्यवस्था करण्यात येत असल्याचा निरोप दिला.’’