बीसीसीआयच्या मान्यतेसाठी उत्तराखंडच्या तीन संघटना एकत्र
By Admin | Updated: January 28, 2015 02:15 IST2015-01-28T02:15:03+5:302015-01-28T02:15:03+5:30
बीसीसीआयची मान्यता मिळावी यासाठी उत्तराखंडमध्ये कार्यरत तिन्ही क्रिकेट संघटनांनी विलीनीकरण करीत एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.

बीसीसीआयच्या मान्यतेसाठी उत्तराखंडच्या तीन संघटना एकत्र
नवी दिल्ली : बीसीसीआयची मान्यता मिळावी यासाठी उत्तराखंडमध्ये कार्यरत तिन्ही क्रिकेट संघटनांनी विलीनीकरण करीत एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात क्रिकेटच्या पाच वेगवेगळ्या संघटना कार्यरत आहेत. यापैकी तीन उत्तराखंड क्रिकेट असोसिएशन, अभिमन्यू क्रिकेट असोसिएशन आणि युनायटेड क्रिकेट असोसिएशन यांनी बीसीसीआयची संलग्नता मिळविण्यासाठी संयुक्त असोसिएशन बनविण्याचा निर्णय घेतला. सन २००० मध्ये उत्तर प्रदेशचे विभाजन होऊन उत्तराखंड हे नवे राज्य निर्माण करण्यात आले. पण राज्यातील एकाही संघटनेला बीसीसीआयने मान्यता दिली नाही. दुसरीकडे त्याच वर्षी वेगळे झालेल्या झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांना क्रिकेट संघटनेचा दर्जा देण्यात आला आहे.
युनायटेड क्रिकेट असोसिएशनचा एक अधिकारी म्हणाला, ‘बीसीसीआयची मान्यता नसल्याने राज्यातील खेळाडूंना राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्यासाठी अन्य राज्य संघांमधून खेळावे लागत आहे. सोमवारी तिन्ही संघटनांची संयुक्त बैठक होऊन खेळाडूंच्या हितासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेण्यात आला.’ सन २००९ मध्ये
यूसीएने मान्यतेसाठी आपला अहवाल मुंबई येथे बीसीसीआयच्या अॅफिलिएशन समितीकडे पाठविला होता.