‘भारत श्री’ स्पर्धेत ६०० शरीरसौष्ठवपटू, शिवछत्रपती क़्रीडा संकुलात आजपासून थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 01:53 IST2018-03-23T01:53:54+5:302018-03-23T01:53:54+5:30
भारतीय शरीरसौष्ठवाचा कुंभमेळा अर्थात ‘भारत श्री’ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत देशभरातील ६०० अव्वल खेळाडू सहभागी होत आहेत. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात शुक्रवारपासून या स्पर्धेचा थरार रंगेल.

‘भारत श्री’ स्पर्धेत ६०० शरीरसौष्ठवपटू, शिवछत्रपती क़्रीडा संकुलात आजपासून थरार
पुणे : भारतीय शरीरसौष्ठवाचा कुंभमेळा अर्थात ‘भारत श्री’ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत देशभरातील ६०० अव्वल खेळाडू सहभागी होत आहेत. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात शुक्रवारपासून या स्पर्धेचा थरार रंगेल.
इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनतर्फे (आयबीबीएफ) या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आयबीबीएफचे सरचिटणीस चेतन पाठारे म्हणाले, ‘४१ राज्य संघ व विविध संस्थामधील ६०० खेळाडू आपल्या सर्वश्रेष्ठ प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. ६०० पैकी सुमारे ४०० खेळाडू मुख्य स्पर्धेत खेळतील. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेतही खेळाडूंचा आकडा नेहमीपेक्षा जास्त असेल.’
- सलग दोन वेळा भारत श्री ठरलेला सुनीत जाधव यंदा हॅट्ट्रिक नोंदविण्याच्या इराद्याने उतरणार आहे. त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.
महाराष्ट्राचे संघ
महाराष्ट्र अ : विनायक गोळेकर, नितीन म्हात्रे, प्रतिक पांचाळ, श्रीनिवास वास्के, सुयश पाटील, सागर कातुर्डे, अजय नायर, सुनीत जाधव, महेंद्र चव्हाण, महेंद्र पगडे, अक्षय मोगरकर, अतुल आंब्रे.
महाराष्ट्र ब : संदेश सकपाळ, श्रीनिवास खारवी, रितेश नाईक, सचिन खांबे, रोहन गुरव, सुशील मुरकर, रवी वंजारे, सुशांत रांजणकर, रोहित शेट्टी, सकिंदर सिंग, राखीव खेळाडू (जगदीश लाड, श्रीदीप गावडे, नितीन शिगवण).
काही वर्षांपूर्वी संघटनात्मक वादामुळे कमकुवत झालेला शरीरसौष्ठव हा खेळ आता खऱ्या अर्थाने बहरत आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंकडून दर्जेदार कामगिरी होईल, अशी अपेक्षा आहे.
- चेतन पाठारे,
सरचिटणीस, इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन