शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

Thomas Cup : भारतीय बॅडमिंटनपटूंचे ऐतिहासिक 'सुवर्ण'; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक अन् १ कोटींचं बक्षीस जाहीर! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 15:59 IST

Thomas Cup : भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने रविवारी थॉसम चषक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. ७३ वर्षांत भारताने या स्पर्धेत पटकावलेले पहिले पदक ठरले

 Thomas Cup : भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने रविवारी थॉसम चषक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. ७३ वर्षांत भारताने या स्पर्धेत पटकावलेले पहिले पदक ठरले आणि त्यांनी अंतिम सामन्यात ही स्पर्धा १४ वेळा जिंकणाऱ्या इंडोनेशियावर ३-० असा विजय मिळवला. लक्ष्य सेन, सात्विकराज रँकीरेड्डी, चिराग शेट्टीव, किदम्बी श्रीकांत, एम आर अर्जुन, ध्रुव कपिला व एचएस प्रणॉय हे या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार ठरले. पुरुष एकेरीच्या पहिल्या सामन्यात लक्ष्य सेनने ( Lakshya Sen) कडव्या संघर्षानंतर इंडोनेशियाच्या अँथोनी सिनिसुका गिंटींगवर ८-२१, २१-१७, २१-१६ असा विजय मिळवला. दुहेरीत सात्विकराज रँकिरेड्डी व चिराग शेट्टी यांनीही ०-१ अशा पिछाडीवरून मुसंडी मारताना मोहम्मद अहसेन व केव्हिन संजया सुकामुल्जो यांचा १८-२१, २३-२१, २१-१९ असा पराभव केला. एकेरीत स्टार किदम्बी श्रीकांतने चुरशीच्या सामन्यात जोनाथन ख्रिस्टी २१-१३, २३-२१ असा विजय मिळवून इतिहास घडवला. भारताने ३-० अशा फरकाने इंडोनेशियाला नमवून सुवर्णपदक नावावर केले.

आतापर्यंत केवळ सहाच देशांना #ThomasCup जिंकता आलेला आहे. त्यात सर्वाधिक १४ जेतेपदं इंडोनेशियाच्या ( १९५८-२०२०) नावावर आहेत. त्यानंतर चीनच्या नावावर १० ( १९८२-२०१८), मलेशियाच्या नावावर ५ ( १९४९-१९९२) आणि जपान ( २०१४), डेन्मार्क ( २०१६) व भारत ( २०२२) यांच्या नावावर प्रत्येकी १ जेतेपद आहे. भारतीय संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले. भारत सरकारने संघाला १ कोटींचे बक्षीस जाहीर केले. 

टॅग्स :BadmintonBadmintonTeam Indiaभारतीय क्रिकेट संघNarendra Modiनरेंद्र मोदी