चा जकार्तामध्ये तिसर्या स्थानावर
By Admin | Updated: April 24, 2015 00:55 IST2015-04-24T00:55:15+5:302015-04-24T00:55:15+5:30
जकार्ता: भारताच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या संघातील खेळाडू अभिजित चाने आज येथे पाच अंडर ६७ चे कार्ड खेळले़ यामुळे तो सीआयएमबी नियागा इंडोनेशिया मास्टर्स गोल्फ स्पर्धेच्या पहिल्या फेरीनंतर तिसर्या स्थानावर आहे़ चा चिनी ताईपेच्या चान शी चांग आणि डेन्मार्कच्या थॉमस ब्योर्नपेक्षा एका शॉटने पिछाडीवर आहे़ या दोघांनी ६६ चे स्कोअर केले़ अन्य एक भारतीय राशीद खान याने तीन अंडर ६९ चे कार्ड खेळले आणि तो संयुक्त सातव्या स्थानावर आहे. खालिन जोशीने ७१ चे कार्ड खेळले आणि तो संयुक्त १६ व्या स्थानावर आहे़ हिम्मत रॉय (७२) संयुक्त २४ व्या, चिराग कुमार (७३) संयुक्त ३८ व्या आणि गगनजीत भुल्लर (७५) संयुक्त ७४ व्या स्थानावर आहे़ अर्जुन अटवाल, राहिल गंगजी, युवा अंगन चिमा आणि एस़ चिक्कारंगप्पा यांनी समान ७८ चे कार्ड खेळले आणि ते संयुक्त ११९ व्या स्थानावर आहेत़

चा जकार्तामध्ये तिसर्या स्थानावर
ज ार्ता: भारताच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या संघातील खेळाडू अभिजित चाने आज येथे पाच अंडर ६७ चे कार्ड खेळले़ यामुळे तो सीआयएमबी नियागा इंडोनेशिया मास्टर्स गोल्फ स्पर्धेच्या पहिल्या फेरीनंतर तिसर्या स्थानावर आहे़ चा चिनी ताईपेच्या चान शी चांग आणि डेन्मार्कच्या थॉमस ब्योर्नपेक्षा एका शॉटने पिछाडीवर आहे़ या दोघांनी ६६ चे स्कोअर केले़ अन्य एक भारतीय राशीद खान याने तीन अंडर ६९ चे कार्ड खेळले आणि तो संयुक्त सातव्या स्थानावर आहे. खालिन जोशीने ७१ चे कार्ड खेळले आणि तो संयुक्त १६ व्या स्थानावर आहे़ हिम्मत रॉय (७२) संयुक्त २४ व्या, चिराग कुमार (७३) संयुक्त ३८ व्या आणि गगनजीत भुल्लर (७५) संयुक्त ७४ व्या स्थानावर आहे़ अर्जुन अटवाल, राहिल गंगजी, युवा अंगन चिमा आणि एस़ चिक्कारंगप्पा यांनी समान ७८ चे कार्ड खेळले आणि ते संयुक्त ११९ व्या स्थानावर आहेत़