पावसामुळे तिसरा सामना रद्द
By Admin | Updated: October 9, 2015 05:00 IST2015-10-09T05:00:34+5:302015-10-09T05:00:34+5:30
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टष्ट्वेंटी-२0 क्रिकेट सामना एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. कोलकात्यात दुपारी झालेल्या पावसामुळे ईडन गार्डनचे मैदान

पावसामुळे तिसरा सामना रद्द
कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टष्ट्वेंटी-२0 क्रिकेट सामना एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. कोलकात्यात दुपारी झालेल्या पावसामुळे ईडन गार्डनचे मैदान खेळण्यायोग्य नसल्याने रात्री साडेनऊ वाजता सामना होणार नसल्याची घोषणा केली.
तीन सामन्यांची ही मालिका दक्षिण आफ्रिकेने २-0 अशी आपल्या नावावर केली आहे. पहिल्या दोन सामन्यांतील पराभवामुळे भारतीय संघ तिसरा सामना जिंकून बाउन्सबॅक करण्यास उत्सुक होता; पण पावसाने ईडन गार्डनवरील प्रेक्षकांची घोर निराशा केली. कोलकात्यात गुरुवारी दुपारी अडीच वाजता जोरदार पाऊस पडला होता. सायंकाळी सहा वाजल्यानंतर पाऊस पूर्णपणे थांबला होता; परंतु दुपारच्या पावसाने मैदानात जागोजागी पाणी साचले होते. क्युरेटर आणि कर्मचाऱ्यांनी तीन सुपरसोकर मशीन लावून मैदान खेळण्यायोग्य करण्याचा प्रयत्न केला; पण आउटफिल्ड खेळण्यास योग्य नसल्याचे पंचांचे मत बनले. पंचांनी साडेसात, साडेआठ आणि शेवटी साडेनऊ वाजता असे तीनदा मैदानाचे निरीक्षण केले. त्यानंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.