शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

देवळीत राज्यस्तरीय कुस्तीचा बिगुल वाजला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 19:07 IST

५०० पहेलवानांची उपस्थिती : एक हजार महिला पहेलवानांचे आज आगमन

देवळी (वर्धा) :  कुस्ती स्पर्धेचा रविवारी बिगुल वाजला. दिवसभर चाललेल्या सामन्यात अनेक नामवंत पहेलवानांनी आपले कसब पणाला लावले. या सर्व लढती दर्शनीय ठरल्या आहे. शुभारंभाला २७ ते २४ या दोन दिवसपर्यंत पुरूष ज्युनिअर गटातील ४१ ते ११० किलो वजनगटात निर्वाचक लढती होत आहेत. यासाठी राज्यभरातून ५०० पुरूष पहेलवान व १५० कुस्ती पंचांनी या ठिकाणी हजेरी लावली आहे. शुभारंभाच्या सकाळी खासदार रामदास तडस यांच्या हस्ते कुस्ती मैदानावर बजरंग बलीच्या मूर्तीची पूजा करून सामन्याला सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र कुस्ती परिषदेचे सरचिटणीस  बाळासाहेब  लांडगे, कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, उपाध्यक्ष गणेश कोहळे, नागनाथ देशमुख व सर्जेराव शिंदे, विभागीय सचिव संजय तिरथकर व सुनील चौधरी, माजी नगराध्यक्ष शोभा तडस, उपाध्यक्ष नरेंद्र मदनकर, सभापती नंदू वैद्य व मारोती मरघाडे तसेच कुस्ती परिषदेच्या पदाधिकाºयांची उपस्थिती होती. सोमवारी, २८ ला सकाळी महिला कुस्तीगीरांचे आगमन होऊन दुपारपर्यंत त्यांचे वजनगट निश्चित केले जाणार आहे.  महिला कुस्ती स्पर्धा ज्युनिअर गटात ३६ ते ७३ वजनगटात व सिनिअर महिला दुसºया ५० ते ७६ वजन गटात रंगणार आहे. यासाठी राज्यभरातून एक हजार महिला पहेलवानांची उपस्थिती राहणार आहे. महिला कुस्त्या २९ व ३० रोजी होणार आहेत, अशी माहिती आयोजक समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

टॅग्स :Wrestlingकुस्ती