अजून खूप काही साध्य करायचे बाकी आहे : कॉन्स्टेनटाइन

By Admin | Updated: April 10, 2017 01:17 IST2017-04-10T01:17:43+5:302017-04-10T01:17:43+5:30

सध्या फिफा रँकिंगमध्ये भारताने १०१व्या स्थानी घेतलेली झेप सर्वांच्या कौतुकास पात्र ठरत आहे. परंतु,

There is still much more to accomplish: Constantine | अजून खूप काही साध्य करायचे बाकी आहे : कॉन्स्टेनटाइन

अजून खूप काही साध्य करायचे बाकी आहे : कॉन्स्टेनटाइन

नवी दिल्ली : सध्या फिफा रँकिंगमध्ये भारताने १०१व्या स्थानी घेतलेली झेप सर्वांच्या कौतुकास पात्र ठरत आहे. परंतु, अजूनही आम्हाला बरीच मोठी मजल मारायची आहे, असे भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेनटाइन यांनी सांगितले. नुकताच फिफाने जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीमध्ये भारताने १०१व्या स्थानी झेप घेताना तब्बल ३१ स्थांनांनी प्रगती केली. मात्र, या कामगिरीला कॉन्स्टेनटाइन अधिक महत्त्व देत नाही. त्याच वेळी, या कामगिरीच्या जोरावर भारताने आशिया कप २०१९ स्पर्धेसाठी पात्र ठरण्यासाठी आणि अव्वल १०० देशांमध्ये स्थान मिळविण्याच्या दिशेन भक्कम वाटचाल केली असल्याचे मानले आहे. कॉन्स्टेनटाइन म्हणाले की, ‘‘आम्हाला आमची एकाग्रता कायम राखण्यावर भर देण्याची गरज आहे. त्याचबरोबर आम्ही अद्याप काहीच साध केलेले नाही, असाच विचार करणे आवश्यक आहे. फिफा रँकिंगमध्ये १०१व्या स्थानी राहत आशिया चषकसाठी पात्र ठरल्यास मला आनंद होईल. मात्र, उच्च रँकिंगसह आशिया चषक स्पर्धेस अपात्र ठरल्यास त्या रँकिंगचा काहीही उपयोग होणार नाही.’’
त्याचप्रमाणे, ‘‘जर आम्ही कठोर मेहनत केली, तर उच्च रँकिंग आणि आशिया चषक पात्र ठरणे हे दोन्ही लक्ष्य आम्ही साध्य करूशकतो, असा मला विश्वास आहे,’’ असेही कॉन्स्टेनटाइन यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

Web Title: There is still much more to accomplish: Constantine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.