‘दुहेरी भूमिके’च्या करारात काही वाईट नाही
By Admin | Updated: July 30, 2015 01:09 IST2015-07-30T01:09:27+5:302015-07-30T01:09:27+5:30
क्रिकेट क्लीन’साठी धडपडणाऱ्या बीसीसीआयने सावध पवित्रा म्हणून ‘दुहेरी भूमिके’शी संबंधित करारावर स्वाक्षरी करण्याचे धोरण अवलंबले आहे. या सकारात्मक बदलाचे स्वागत करीत

‘दुहेरी भूमिके’च्या करारात काही वाईट नाही
नवी दिल्ली : ‘क्रिकेट क्लीन’साठी धडपडणाऱ्या बीसीसीआयने सावध पवित्रा म्हणून ‘दुहेरी भूमिके’शी संबंधित करारावर स्वाक्षरी करण्याचे धोरण अवलंबले आहे. या सकारात्मक बदलाचे स्वागत करीत स्वाक्षरी करण्यात काहीच वाईट नसल्याचे मत माजी कर्णधार सौरव गांगुली याने व्यक्त केले आहे. माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना आयपीएल संघ खरेदी करण्याची परवानगी देणे आणि त्यानंतर वाद उद्भवल्यानंतर बोर्डाचे नवे पदाधिकारी स्वत:ची पत सुधारण्यात व्यस्त आहेत. सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मणसह बोर्डाच्या सल्लागार समितीचा सदस्य असलेल्या सौरभने बोर्डाच्या या भूमिकेचे स्वागत केले. एका कार्यक्रमानंतर बोलताना गांगुली म्हणाला,‘‘बीसीसीआयने क्रिकेटशी जुळलेल्या प्रत्येक व्यक्तीला नव्या कराराची माहिती दिली आहे. यात काही त्रास उद्भवेल, असे वाटत नाही. प्रत्येकाने बोर्डाकडे एक लेखी घोषणापत्र द्यायचे आहे.’’ विविध कंपन्या आणि बोर्डाशी संबंध असलेल्या फर्मशी संबंधित व्यक्ती सध्या बीसीसीआयमध्ये काम करीत आहेत, त्यांना दुहेरी भूमिकेची भीती वाटत असावी, असे आपल्याला वाटते काय, असा सवाल करताच सौरभ म्हणाला, की कुणाचा करार कुणासोबत आहे, याची माहिती मी ठेवत नाही, त्यामुळे वादग्रस्त विषयावर भाष्यदेखील करणार नाही. बोर्डाने अशी प्रकरणे हाताळावीत. (वृत्तसंस्था) बीसीसीआयने क्रिकेटशी जुळलेल्या प्रत्येक व्यक्तीला नव्या कराराची माहिती दिली आहे. यात काही त्रास उद्भवेल, असे वाटत नाही. प्रत्येकाने बोर्डाकडे एक लेखी घोषणापत्र द्यायचे आहे. - सौरव गांगुली