संघाबाहेर बसणे याहून वाईट काही नाही : युवराज
By Admin | Updated: December 20, 2015 23:56 IST2015-12-20T23:56:59+5:302015-12-20T23:56:59+5:30
खूप काळ संघाबाहेर बसणे याहून वाईट दुसरे काहीच असू शकत नाही. हा खूप कठीण काळ होता. मात्र तरीही मी प्रयत्न आणि आशा सोडल्या नव्हत्या. संघात पुनरागमन होण्याची मला पूर्ण खात्री होती

संघाबाहेर बसणे याहून वाईट काही नाही : युवराज
कोलकाता : खूप काळ संघाबाहेर बसणे याहून वाईट दुसरे काहीच असू शकत नाही. हा खूप कठीण काळ होता. मात्र तरीही मी प्रयत्न आणि आशा सोडल्या नव्हत्या. संघात पुनरागमन होण्याची मला पूर्ण खात्री होती, अशा शब्दांत टी-२० मध्ये टीम इंडियात पुनरागमन केलेल्या धडाकेबाज फलंदाज युवराज सिंगने आपली प्रतिक्रिया दिली.
कोलकाता येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये युवराजने संघाबाहेर घालवलेला काळ अत्यंत कठीण असल्याचे सांगितले. याआधी युवराज २०१४ साली झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध भारताकडून सामना खेळला होता. विजय हजारे चषक एकदिवसीय स्पर्धेत आपल्या तुफानी खेळीने युवीने राष्ट्रीय निवड समितीचे लक्ष वेधले. युवीने सध्या सुरू असलेल्या या स्पर्धेत युवीने ५ सामन्यांतून ८५.२५ च्या जबरदस्त सरारीने आणि १०३.६४ च्या धावगतीने ३४१ धावा कुटल्या आहेत. त्याने आपल्या खेळीच्या जोरावर पंजाबला एकहाती उपांत्यपूर्व फेरीत नेले.
आपल्या पुनरागमनाविषयी युवीने सांगितले, की जेव्हा तुम्ही देशाकडून खेळत असता तेव्हा तुमच्यावर आपल्या समर्थकांच्या अपेक्षांचे दडपण असते.