IPL मधील भ्रष्टाचार प्रकरणात माझ्याविरोधात पुरावे नाही - धोनी
By Admin | Updated: January 25, 2015 15:37 IST2015-01-25T15:37:14+5:302015-01-25T15:37:14+5:30
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी महेंद्रसिंग धोनीने अखेर मौन सोडले असून याप्रकरणात माझ्याविरोधात कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही असे त्याने म्हटले आहे.

IPL मधील भ्रष्टाचार प्रकरणात माझ्याविरोधात पुरावे नाही - धोनी
ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. २५ - आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी महेंद्रसिंग धोनीने अखेर मौन सोडले असून याप्रकरणात माझ्याविरोधात कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. पण तरीदेखील याप्रकरणात माझे नाव गोवणे सुरुच राहील अशा शब्दात धोनीने नाराजी व्यक्त केली.
तिरंगी मालिकेत सोमवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी आज कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पत्रकार परिषद घेतली. यामध्ये धोनीने पहिल्यांदाच आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणात मौन सोडले. आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये मुदगल समितीने दिलेल्या १३ खेळाडूंच्या यादीमध्ये महेंद्रसिंग धोनीचे नाव असल्याची चर्चा आहे. अद्याप ही यादी जाहीर झाली नाही. यापार्श्वभूमीवर धोनी म्हणाला, आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये माझ्याविरोधात कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. पण भारतीय क्रिकेटचा विषय निघाल्यास त्यात माझे नाव येतच राहील. प्रत्येक गोष्टीत मला गोवले जाईल. याची मला सवय झाली आहे असे टोला धोनीने लगावला. मला अशा गोष्टींची सवय झाली असून दररोज नवनवीन कहाणी येतच राहील असे धोनीने म्हटले आहे.