धोनी-विराटमध्ये वाद नाही - शमी
By Admin | Updated: June 28, 2015 01:31 IST2015-06-28T01:31:13+5:302015-06-28T01:31:13+5:30
कसोटी कर्णधार विराट कोहली व वन डे कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्यादरम्यानच्या वादाचे वृत्त निराधार असून भारतीय ड्रेसिंग रूममधील वातावरण चांगले आहे

धोनी-विराटमध्ये वाद नाही - शमी
बंगळुरू : कसोटी कर्णधार विराट कोहली व वन डे कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्यादरम्यानच्या वादाचे वृत्त निराधार असून भारतीय ड्रेसिंग रूममधील वातावरण चांगले आहे, अशी प्रतिक्रिया वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने व्यक्त केली. शमी म्हणाला, संघात गटबाजीमुळे कामगिरीवर प्रभाव पडल्याचे वृत्त निराधार आहे. त्यांच्यादरम्यान वाद असल्याचे मला कधीच जाणवले नाही. मीडिया जर हा मुद्दा उपस्थित करीत असेल तर ते चुकीचे आहे.