थारिंडुचे चेन्नईत होणार गोलंदाजी शैलीचे परीक्षण

By Admin | Updated: September 7, 2015 00:06 IST2015-09-07T00:06:40+5:302015-09-07T00:06:40+5:30

भारताविरुद्ध मालिकेच्या तिसऱ्या कसोटीत संशयित गोलंदाजी शैलीच्या आरोपाचा सामना करणाऱ्या श्रीलंकन आॅफस्पिनर थारिंडू कौशल याचे चेन्नईत

Tharindu will be in the bowling alley test in Chennai | थारिंडुचे चेन्नईत होणार गोलंदाजी शैलीचे परीक्षण

थारिंडुचे चेन्नईत होणार गोलंदाजी शैलीचे परीक्षण

चेन्नई : भारताविरुद्ध मालिकेच्या तिसऱ्या कसोटीत संशयित गोलंदाजी शैलीच्या आरोपाचा सामना करणाऱ्या श्रीलंकन आॅफस्पिनर थारिंडू कौशल याचे चेन्नईत श्री रामचंद्र युनिव्हर्सिटी लॅबमध्ये गोलंदाजी शैलीचे परीक्षण होणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत संशयित गोलंदाजी शैलीच्या परीक्षणासाठी थारिंडू १३ सप्टेंबरला भारत दौऱ्यावर येणार आहे. थारिंडूची गोलंदाजी शैली एसएससी स्टेडियममध्ये तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीनंतर संशयित असल्याचे आढळले होते.
२२ वर्षीय श्रीलंकन गोलंदाजासोबत श्रीलंकन क्रिकेट (एसएलसी)चे कोचिंगप्रमुख जेरोम जयरत्नेदेखील भारतात येणार आहेत. २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या थारिंडूने श्रीलंकेकडून सहा कसोटी आणि एक वनडे सामना खेळला आहे. श्रीलंकेचा प्रमुख फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन निवृत्त झाल्यानंतर थारिंडूला राष्ट्रीय संघातील पुढील प्रमुख फिरकी गोलंदाज म्हणून मानले जात आहे; परंतु आक्षेपार्ह गोलंदाजी शैलीच्या आरोपामुळे त्यांच्या अपेक्षांना मोठा धक्का बसला आहे.भारताविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत थारिंडूची कामगिरी लाजवाब ठरली होती आणि त्याने ३८.१५ च्या सरासरीने १३ गडी बाद केले होते. गेल्या १६ महिन्यांत थारिंडू श्रीलंकेतील गोलंदाजी शैली संशयित असल्याचा आरोप असणारा दुसरा आॅफस्पिनर आहे. याआधी गेल्या वर्षी मे महिन्यात इंग्लंडमध्ये सचित्र सेनानायके याची गोलंदाजी शैलीदेखील बेकायदेशीर असल्याचे आढळले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: Tharindu will be in the bowling alley test in Chennai