परीक्षकांनी दिला चुकीचा निकाल
By Admin | Updated: November 27, 2015 21:33 IST2015-11-27T21:33:58+5:302015-11-27T21:33:58+5:30
जळगाव : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे गुरुवारी आयोजित युवा महोत्सव स्पर्धेत परीक्षकांनी चुकीचा निकाल दिल्याची तक्रार लक्षवेधी फाउंडेशनतर्फे करण्यात आली आहे.

परीक्षकांनी दिला चुकीचा निकाल
ज गाव : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे गुरुवारी आयोजित युवा महोत्सव स्पर्धेत परीक्षकांनी चुकीचा निकाल दिल्याची तक्रार लक्षवेधी फाउंडेशनतर्फे करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे लक्षवेधी फाउंडेशनचे प्रदीप भोई, गणेश बागडे, प्रसाद कासार, भूषण चिंचोले, नीलेश भोई, सचिन सोनवणे, राकेश कोळी यांनी तक्रार दिली आहे. स्पर्धेप्रसंगीही झाला होता वाद पारंपरिक लोक नृत्याचा संबंधही नसतानाही या स्पर्धेच्या परीक्षणासाठी संगीत क्षेत्रातील परीक्षक नियुक्त करण्यात आले होते. लोकनृत्य प्रकारात जो समूह प्रथम आला. त्या समूहाने गोप नृत्य हे चुकीच्या पद्धतीने सादर केले होते. तरीही याच संघाला परीक्षकांनी विजयी घोषित केले. याबाबत चौकशी करून निकाल जाहीर करावा, अशी मागणी स्पर्धकांनी केली आहे. समिती निर्णय याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, की पंचानी दिलेला निर्णय हा अंतिम असतो. तरीही याबाबत निवड समिती जो निर्णय घेईल, तो अंतिम राहील. १२ ते १९ जानेवारी दरम्यान युवा दिनानिमित्त या स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे.