कसोटी क्रमवारीत अश्विन एक नंबरी
By Admin | Updated: October 12, 2016 16:41 IST2016-10-12T16:34:36+5:302016-10-12T16:41:03+5:30
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार कामगीरी करत 30 बळी मिळवणारा आर. अश्विन कसोटी क्रमवारी अव्वल स्थानी विराजमान झाला आहे.

कसोटी क्रमवारीत अश्विन एक नंबरी
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार कामगीरी करत 30 बळी मिळवणारा आर. अश्विन कसोटी क्रमवारी अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या क्रमवारीनुसार अश्विनने तिसऱ्या क्रमांकवूर पहिल्यास्थावर झेप घेतली आहे. त्याच्या नावावर आता 900 गुण आहेत. 38 कसोटी सान्यात अश्विनने 7 वेळा सामनावीर पुरस्कार आपल्या नावावर केला आहे. विशेष म्हणजे आयसीसीच्या अष्टपैलू खेळाडूमध्येही आर.अश्विन प्रथम क्रमांकावर आहे.
गोलंदाजी क्रमवारीत अश्विननंतर द. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन(878) तिसऱ्या क्रमांकावर इंग्लडचा जेम्स अँडरस्न(870) आहे. गोलंदाजीमध्ये 10 टेनमध्ये रविंद्र जाडेजालाही स्थान मिळाले आहे. जाडेजा आठव्या क्रमांकावरुन सातव्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.
फलंदाजीच्या कसोटी क्रमवारी अजिंक्य रहाणे हा एकमेव भारतीय खेळाडू पहिल्या 10 मध्ये आहे. रहाणेने दोन स्थानाची प्रगती करत सहावे स्थान काबिज केले आहे. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली कसोटी क्रमवारीत 16 व्या स्थानावर आहे. तर चेतेश्वर पुजाराने 20 स्थानावरुन 15 व्या स्थानावर झेप घेतली आहे. रोहीत शर्माने 17 स्थानाची प्रगती करत 37 वे स्थान काबिज केले आहे.
आयसीसी कसोटी क्रमवारी भारतीय संघाने पाकला मागे टाकत प्रथम क्रमांक काबिज केला आहे.
आणखी वाचा -
- पुजारा, आश्विन यांचा चमकदार खेळ
- अश्विनच्या नावे अनोखा विक्रम
- भारताची 'विजयादशमी', अश्विनने केले किवीचे 'दहन'