दहशतवादाचे सावट, पण पीएसएल फायनल लाहोरमध्येच!
By Admin | Updated: February 27, 2017 22:37 IST2017-02-27T22:37:26+5:302017-02-27T22:37:26+5:30
पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) टी-२० क्रिकेटचा अंतिम सामना ५ मार्च रोजी लाहोरमध्येच होणार आहे. या शहरात नुकतेच बॉम्बस्फोट झाल्यामुळे दहशतवादी हल्ल्याचे सावट

दहशतवादाचे सावट, पण पीएसएल फायनल लाहोरमध्येच!
>ऑनलाइन लोकमत
कराची, दि. 27 - पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) टी-२० क्रिकेटचा अंतिम सामना ५ मार्च रोजी लाहोरमध्येच होणार आहे. या शहरात नुकतेच बॉम्बस्फोट झाल्यामुळे दहशतवादी हल्ल्याचे सावट कायम असले, तरी पीसीबीच्या आयोजनास पंजाब सरकारने स्वीकृती बहाल केली.

पीएसएलप्रमुख नजम सेठी यांनी गडाफी स्टेडिियमवर दीर्घकाळ बैठक घेतल्यानंतर मीडियाशी बोलताना सांगितले की, प्रतिकूल परिस्थितीतही निर्धारित वेळापत्रकानुसार फायनलचे आयोजन लाहोरमध्येच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सेठी पुढे म्हणाले, ‘माझ्या मते पीएसएल फायनलचे आयोजन लाहोरमध्ये करणे म्हणजे पाकिस्तान दहशतवादापुढे झुकत नाही, असा संदेश जगाला देणे. आम्ही शांतताप्रिय आहोत. क्रिकेट चाहत्यांच्या आशाआकांक्षांचे भान राखून लाहोरमध्येच फायनलचचे आयोजन करण्याचा आम्ही निर्णय घेतला.’
इम्रान खानची सडकून टीका माजी कर्णधार इम्रान खान याने मात्र फायनलचे आयोजन लाहोरमध्ये करणे हा पीसीबीचा ‘माथेफिरू’पणा असल्याची टीका केली. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या ‘तहरिक-ए-इन्साफ’ या पक्षाचा प्रमुख इम्रान म्हणाला,
‘गडाफी स्टेडियमचे रस्ते चोहीकडून बंद असतील आणि सडकेवर केवळ पोलीस दिसणार असल्याने जगात काय संदेश जाईल? अशा पद्धतीच्या वातावरणामुळे जगभर शांततेचा संदेश देता येणार नाही. आधीच दहशत असलेल्या या शहरात मोठे आयोजन
सध्या तरी करण्यात येऊ नये.’ पीसीबीचे माजी सीईओ आरिफ अली खान अब्बासी यांनीदेखील फायनलचे आयोजन लाहोरमध्ये करण्यास विरोध दर्शविला आहे.