टेनिस - सानिया आणि रोहनचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

By Admin | Updated: August 12, 2016 05:32 IST2016-08-12T05:32:12+5:302016-08-12T05:32:12+5:30

सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा या जोडीने मिश्र दुहेरीतील सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या जोडीचा ७-५, ६-४ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

Tennis - Sania and Rohan enter the quarter-finals | टेनिस - सानिया आणि रोहनचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

टेनिस - सानिया आणि रोहनचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. १२ : सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा या जोडीने उत्तम कामगिरी करताना रिओ ऑलिम्पिक टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीतील सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या समंथा स्टोसूर व जॉन पियर्स या जोडीचा ७-५, ६-४ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
सानियाचे यंदाचे ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागाचे तिसरे वर्षे आहे. सानिया आणि रोहन याआधी अनेक वर्षे एकत्र खेळले आहेत. त्यांनी हॉपमन चषकातही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आठ-नऊ वर्षे एकत्र खेळताना हे दोघे अपराजित राहीले होते यामुळेच बहुदा त्यांना आजच्या सामन्यात सहज विजयी मिळवता आला.

Web Title: Tennis - Sania and Rohan enter the quarter-finals