टेनिसपटूकडून महिला क्रीडा पत्रकाराचा मुका घेण्याचा प्रयत्न !
By Admin | Updated: May 31, 2017 05:23 IST2017-05-31T05:22:47+5:302017-05-31T05:23:36+5:30
एका महिला क्रीडा पत्रकाराचा मुलाखतीदरम्यान मुका घेण्याचा प्रयत्न करणार्या टेनिसपटू मॅक्झीम हमाउ याच्यावर

टेनिसपटूकडून महिला क्रीडा पत्रकाराचा मुका घेण्याचा प्रयत्न !
>ऑनलाइन लोकमत
पॅरिस, दि. 31 - एका महिला क्रीडा पत्रकाराचा मुलाखतीदरम्यान मुका घेण्याचा प्रयत्न करणार्या टेनिसपटू मॅक्झिम हमाऊ याच्यावर फ्रेन्च ओपन टेनिस स्पध्रेच्या आयोजकांनी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
या २१ वर्षीय फ्रेन्च खेळाडूने सदर महिला पत्रकाराला मिठी मारुन मुका घेण्याचा प्रयत्न केला परंतु तिने कसाबसा हा प्रयत्न हाणून पाडला. फ्रेंच टेनिस फेडरेशनने हमाऊ याने केलेल्या या कृत्याचा धिक्कार केला असून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, हमाऊने घडलेल्या या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. हमाउ फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतून पहिल्याच फेरीत बाद झाल्यानंतर सोमवारी सदर महिला पत्रकार त्याची मुलाखत घेत होती. हमाउ ऊरुग्वेच्या पॅबलो क्यूवास सोबत झालेल्या लढतीत पराभूत झाला होता.