Roger Federer Retirement: 'राजा' रिटायर होतोय; टेनिस सम्राट रॉजर फेडररची निवृत्तीची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 07:14 PM2022-09-15T19:14:21+5:302022-09-15T19:16:37+5:30

२० ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकणाऱ्या फेडररने जाहीर केला मोठा निर्णय

Tennis Legend Roger Federer Announces Retirement | Roger Federer Retirement: 'राजा' रिटायर होतोय; टेनिस सम्राट रॉजर फेडररची निवृत्तीची घोषणा

Roger Federer Retirement: 'राजा' रिटायर होतोय; टेनिस सम्राट रॉजर फेडररची निवृत्तीची घोषणा

googlenewsNext

Roger Federer Announces Retirement: टेनिसची पंढरी मानल्या जाणाऱ्या विम्बल्डनच्या हिरवळीवर अनेक वर्षं अधिराज्य गाजवणारा आणि तब्बल २० ग्रँडस्लॅम ट्रॉफींवर नाव कोरणारा टेनिसमधला 'ब्रँड' रॉजर फेडरर याने आज अचानक निवृत्तीची घोषणा करून आपल्या चाहत्यांना धक्का दिला. 'टेनिसचा सम्राट' असलेल्या स्वित्झर्लंडच्या ४१ वर्षी रॉजर फेडररने ट्विटरवर एक भावनिक पोस्ट शेअर करून याची घोषणा केली. पुढील आठवड्यात लंडनमध्ये होणाऱ्या लेव्हर कपमध्ये फेडरर शेवटची व्यावसायिक स्तरावरील स्पर्धा खेळताना दिसणार आहे. पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकण्याच्या बाबतीत फेडरर संयुक्त दुसऱ्या स्थानावर आहे. राफेल नदालने २२ ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावली आहेत.

आपल्या टेनिस कारकिर्दीतील प्रवासात फेडररने त्याचे चाहते आणि प्रतिस्पर्धी खेळाडूंचे आभार मानले आहेत. फेडरर म्हणाला की वयाच्या ४१ व्या वर्षी त्याला वाटते की आता टेनिस खेळणं थांबवण्याची वेळ आली आहे. फेडरर म्हणाला, 'मी ४१ वर्षांचा आहे. मी २४ वर्षात १५०० पेक्षा जास्त सामने खेळले आहेत. टेनिसने मला कायमच खूप काही दिले. पण आता माझी स्पर्धात्मक कारकीर्द संपण्याबद्दल मी निर्णय घेतला आहे.' फेडररने पुढे प्रत्येक मिनिटाला त्याच्या पाठीशी उभ्या असलेल्या पत्नी मिर्काचे आभार मानले. ' प्रत्येक फायनलपूर्वी तिने मला खूप प्रोत्साहन दिले. एका विशिष्ट फायनलच्या वेळी तर ती ८ महिन्यांची गरोदर असतानाही तिने माझे सामने पाहिले आणि २० वर्षांहून अधिक काळ ती माझ्यासोबत आहे.'

दरम्यान, रॉजर फेडररने २८ जानेवारी २०१८ रोजी ऑस्ट्रेलियन ओपनद्वारे शेवटचे ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकले. त्यानंतर विजेतेपदाच्या लढतीत त्याने क्रोएशियाच्या मारिन सिलिकचा पराभव केला. त्यावेळी २० ग्रँडस्लॅम जिंकणारा तो पहिला पुरुष खेळाडू ठरला. मात्र, या वर्षाच्या शेवटी राफेल नदालने त्याचा विक्रम मोडला. त्या विजेतेपदानंतर फेडररवर वयाचा प्रभाव स्पष्टपणे दिसू लागला आणि त्याचा फॉर्म काहीसा घसरला. दुखापतीमुळे फेडररला यावर्षी एकाही ग्रँडस्लॅममध्ये भाग घेता आला नाही. फेडररने २०२१ मध्ये फ्रेंच ओपन ही शेवटची ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळली.

Web Title: Tennis Legend Roger Federer Announces Retirement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.