तेंडुलकर-वॉर्र्नने घेतली रिचर्ड्सन यांची भेट

By Admin | Updated: June 4, 2015 01:19 IST2015-06-04T01:19:40+5:302015-06-04T01:19:40+5:30

सचिन तेंडुलकर व शेन वॉर्न यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) मुख्याधिकारी डेव्ह रिचर्ड्सन यांची भेट घेऊन प्रस्तावित लीजंड टी-टष्ट्वेन्टी

Tendulkar-Warren gifted Richardson a gift | तेंडुलकर-वॉर्र्नने घेतली रिचर्ड्सन यांची भेट

तेंडुलकर-वॉर्र्नने घेतली रिचर्ड्सन यांची भेट

दुबई : सचिन तेंडुलकर व शेन वॉर्न यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) मुख्याधिकारी डेव्ह रिचर्ड्सन यांची भेट घेऊन प्रस्तावित लीजंड टी-टष्ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाबाबत चर्चा केली. तसेच स्पर्धेचे स्वरुप कसे असेल या विषयी देखील त्यांची चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यात ही स्पर्धा अमेरिकेत घेण्यात येणार आहे.
आयसीसीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार सचिन व वॉर्न यांनी आयसीसीच्या मुख्यालयाला भेट दिली. तसेच मुख्यकार्यकारी अधिकारी रिचर्डसन यांची भेट घेतली. यात स्पर्धेच्या ब्लू प्रिंटवर चर्चा झाली.
मात्र ही स्पर्धा काही व्यक्तींकडून आयोजित केली जात आहे. त्यामुळे अशा स्पर्धेला मंजुरी देण्याचा अधिकार आयसीसीला नाही. स्थानिक क्रिकेट मंडळाच्या आखत्यारीतील ही बाब आहे. आयसीसीच्या नियमानुसार स्थानिक क्रिकेट मंडळ अशा स्पर्धांना मान्यता देते व त्याची माहिती संघटनेला कळविते. एस्सेल समुहाने आयोजित केलेल्या इंडियन क्रिकेट लीग स्पर्धेला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मान्यता दिली नव्हती. त्यामुळे ही स्पर्धा आयसीसीने अनधिकृत ठरविली होती. तर इंडियन प्रिमियर लीग, सीपीएल, नेटवेस्ट टी-२० या स्पर्धांना अनुक्रमे बीसीसीआय, ईसीबी व वेस्टइंडिज क्रिकेट बोर्डाने मंजुरी दिली होती. त्यामुळे या स्पर्धांना मान्यता देण्यात आली. (वृत्तसंस्था)

Web Title: Tendulkar-Warren gifted Richardson a gift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.