तेंडुलकर-वॉर्न पुन्हा मैदानात उतरणार
By Admin | Updated: October 7, 2015 03:03 IST2015-10-07T03:03:29+5:302015-10-07T03:03:29+5:30
क्रिकेटच्या मैदानावर विळ््या-भोपळ््याचे नाते असणारे दोन दिग्गज माजी क्रिकेटपटू मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर व आॅस्ट्रेलियाचा जादुई फिरकी गोलंदाज शेर्न वॉर्न

तेंडुलकर-वॉर्न पुन्हा मैदानात उतरणार
वॉशिंग्टन : क्रिकेटच्या मैदानावर विळ््या-भोपळ््याचे नाते असणारे दोन दिग्गज माजी क्रिकेटपटू मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर व आॅस्ट्रेलियाचा जादुई फिरकी गोलंदाज शेर्न वॉर्न पुन्हा मैदानावर उतरणार आहेत. अमेरिकेत येत्या नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-२० सामन्यांत ते आपली जादू दाखविणार आहेत.
हे सामने ७ नोव्हेंबरला सिटी फिल्ड न्यूयॉर्क, ११ नोव्हेंबरला मिनट मेड पार्क ह्युस्टन व १४ नोव्हेंबरला लॉज एंजलिसच्या डोगेर स्टेडियमवर होणार आहेत. अमेरिकेत क्रिकेटची लोकप्रियता वाढावी या साठी हा टी-२० प्रयत्न केला जात आहे. यात एक डझनहून अधिक माजी क्रिकेटपटू सहभागी होत आहेत. त्यात पाकिस्तानचा वसिम अक्रम, वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा, दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस, इंग्लंडचा मायकेल वॉर्न, श्रीलंकेच्या
महेला जयवर्धने यांचा देखील समावेश आहे.
तेंडुलकर म्हणाला, आम्ही लोकांच्या मनोरंजनासाठी येथे येत आहोत. त्यांच्या स्मृतीमध्ये एक चांगली आठवण आम्ही ठेवून जाऊ. तसेच यामुळे क्रिकेटच्या प्रसारास देखील मदत होणार आहे. वॉर्न या विषयी बोलताना म्हणाला, अमेरिकेतील सर्व सामने आव्हानात्मक असतीलच. मात्र हे सामने लोकांचे भरपूर मनोरंजन करतील. जेव्हा सचिन नाणेफेकीसाठी मैदानात येईल, तो क्षण एतिहासिक असेल.