आयपीएलच्या २ नव्या संघांसाठी निविदा : बीसीसीआय

By Admin | Updated: August 6, 2015 22:55 IST2015-08-06T22:55:57+5:302015-08-06T22:55:57+5:30

आयपीएलच्या नवव्या पर्वासाठी बीसीसीआय नव्या दोन फ्रँचायसींसाठी निविदा काढू शकते. लोढा समितीच्या आदेशामुळे निलंबित करण्यात आलेले

Tender for 2 new IPL teams: BCCI | आयपीएलच्या २ नव्या संघांसाठी निविदा : बीसीसीआय

आयपीएलच्या २ नव्या संघांसाठी निविदा : बीसीसीआय

नवी दिल्ली : आयपीएलच्या नवव्या पर्वासाठी बीसीसीआय नव्या दोन फ्रँचायसींसाठी निविदा काढू शकते. लोढा समितीच्या आदेशामुळे निलंबित करण्यात आलेले राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्स या संघाऐवजी नवे संघ खेळविण्याची बीसीसीआयची तयारी आहे.
मीडिया वृत्तानुसार बीसीसीआयच्या कार्यकारी समूहाने फ्रँचायसींसोबत बैठकांचे सत्र आयोजित करून २०१६च्या आयपीएलसाठी मसुदा तयार केला. बोर्डाच्या सूत्रानुसार नव्या संघासाठी निविदा काढल्या जातील आणि ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी असेल. बीसीसीआयने कार्यसमूहाला सहा आठवड्यांच्या आत आयपीएलच्या नवव्या पर्वासाठी मसुदा तयार करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी या प्रकरणी लवकरात लवकर ठोस तोडगा काढला जाईल, असे संकेत दिले. (वृत्तसंस्था)

Web Title: Tender for 2 new IPL teams: BCCI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.