तेलगू टायटन्स, पिक पँथर संघ विजयी

By Admin | Updated: February 1, 2016 02:31 IST2016-02-01T02:31:11+5:302016-02-01T02:31:11+5:30

राहुल चौधरीने शेवटच्या चढाईत मिळविलेल्या १ गुणाच्या जोरावर तेलगू टायटन्स संघाने प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पुणेरी पलटन संघाचा २७-२६ गुणांनी पराभव केला.

Telugu Titans, Pick Panther team won | तेलगू टायटन्स, पिक पँथर संघ विजयी

तेलगू टायटन्स, पिक पँथर संघ विजयी

विशाखापटणम् : राहुल चौधरीने शेवटच्या चढाईत मिळविलेल्या १ गुणाच्या जोरावर तेलगू टायटन्स संघाने प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पुणेरी पलटन संघाचा २७-२६ गुणांनी पराभव केला. दुसरीकडे अभिषेक बच्चनच्या मालकीचा जयपूर पिक पँथर संघाने गतविजेत्या यू मुंबा संघाला २७-१८ गुणांनी नमविले.
राजीव गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेतील आजच्या पहिल्या लढतीत मनजीत चिल्लरच्या उत्कृष्ट खेळीमुळे पुणेरी पलटन संघाने मध्यंतरापर्यंत १७-१४ गुणांची आघाडी घेतली होती. या वेळेत मनजीतने ८ गुण मिळविले. १९ व्या मिनिटाला पुणेरी पलटनने तेलगू संघावर लोन चढविला परंतु, मध्यंतरानंतर तेलगू टायटन्सचा खेळाडू सुकेश हेगडे आणि राहुल चौधरी यांनी आक्रमक चढाया आणि नेत्रदीपक पकडी करून गुणांची बरोबरी आणली. पुणेरी पलटनकडे २५-२३ अशी आघाडी असताना सुकेश हेगडेने दोन गुण मिळवून २५-२५ बरोबरी केली. राहुल चौधरीनेसुद्धा १ गुण घेतला. तेव्हा तेलगूकडे १ गुणाची आघाडी आली. नंतर पुणे संघाकडून १ गुण मिळविला गेल्यामुळे गुण संख्या २६-२६ झाली. शेवटच्या चढाईत सुकेशने पुन्हा गुण मिळविला आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. (वृत्तसंस्था)

Web Title: Telugu Titans, Pick Panther team won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.