टीम इंडियाचा 'स्टार' होणार गायब, कोण घेणार जागा?
By Admin | Updated: February 28, 2017 19:28 IST2017-02-28T19:22:27+5:302017-02-28T19:28:48+5:30
टीम इंडियाच्या जर्सीवरून लवकरच स्टार गायब होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रायोजक

टीम इंडियाचा 'स्टार' होणार गायब, कोण घेणार जागा?
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - टीम इंडियाच्या जर्सीवरून लवकरच स्टार गायब होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रायोजक असलेल्या स्टार इंडियाने दुस-यांदा प्रायोजकत्वासाठी बोली न लावण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढील महिन्यात स्टारचा करार संपणार आहे. डिसेंबर 2013 मध्ये सहाराची स्पॉन्सरशिप संपल्यानंतर स्टार भारतीय संघाचे मुख्य स्पॉन्सर बनले होते.
टीम इंडियासोबत आम्ही जोडले गेलो याचा आम्हाला अभिमान आहे असं स्टार इंडियाचे सीईओ उदय शंकर म्हणाले. पण सध्याची स्थिती पाहून आम्ही दुस-यांदा प्रायोजकत्वासाठी बोली न लावण्याचा निर्णय घेतला आहे.
का लावणार नाही बोली?
बीसीसीआय आणि आयसीसीमधील संबंध कटू होत असून भविष्यात त्याचा खेळावर परिणाम होईल असं उदय शंकर म्हणाले. त्यामुळेच दुस-यांदा बोली न लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मिळणार नवा स्पॉन्सर-
बीसीसीआय आणि स्टार इंडियामधील करार मार्च महिन्याच्या अखेर संपणार आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी भारतीय संघाला नवा स्पॉन्सर मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे 1 जूनपासून सुरू होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संघाच्या जर्सीवर नवं नाव दिसेल.
डिजिटल स्पॉन्सर मिळण्याची शक्यता-
डिजीटल मार्केटिंगमधील अनेक कंपन्यांची स्पॉन्सरशीप घेण्याची तयारी असल्याचं वृत्त आहे. यामध्ये पेटीएम सर्वात पुढे आहे. पेटीएम सध्या बीसीसीआयचा टायटल स्पॉन्सर आहे. याशिवाय रिलायन्स जिओ आणि आयडिया सेल्यूलर या कंपन्या या स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत येऊ शकतात.