टीम इंडियाला सेमीचा ‘मौका’
By Admin | Updated: March 19, 2015 01:26 IST2015-03-19T01:26:24+5:302015-03-19T01:26:24+5:30
‘ब’ गटात विजयांचा षटकार लगावून तुफान फॉर्ममध्ये असलेल्या टीम इंडियासमोर आज बेभरवशाच्या बांगलादेशचे आव्हान असेल.

टीम इंडियाला सेमीचा ‘मौका’
मेलबर्न : ‘ब’ गटात विजयांचा षटकार लगावून तुफान फॉर्ममध्ये असलेल्या टीम इंडियासमोर आज बेभरवशाच्या बांगलादेशचे आव्हान असेल. इंग्लंडला नमवून दिमाखात बाद फेरी गाठलेल्या बांगलादेशला कर्णधार धोनी कमी लेखणार नाही. दुसऱ्या बाजूला बांगलादेश २००७च्या स्पर्धेतील सामन्याची पुनरावृत्ती करण्याच्या उद्देशाने उतरेल. मात्र एकूणच फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण अशा सर्वच बाबी लक्षात घेता, या सामन्यात भारताला विजयाची अधिक संधी असेल.