लंका दौऱ्यासाठी आज टीम इंडियाची निवड
By Admin | Updated: July 23, 2015 00:57 IST2015-07-23T00:57:52+5:302015-07-23T00:57:52+5:30
श्रीलंकेविरुद्ध १२ आॅगस्टपासून तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळायला जाणाऱ्या टीम इंडियाची निवड उद्या संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील

लंका दौऱ्यासाठी आज टीम इंडियाची निवड
नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्ध १२ आॅगस्टपासून तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळायला जाणाऱ्या टीम इंडियाची निवड उद्या संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय निवड समिती करेल. तिसरा फिरकी गोलंदाज संघात घेण्यावर अधिक भर असेल, असे बोलले जाते.
संघनिवडीत जवळपास १३ खेळाडूंची निवड निश्चित मानली जात आहे. संघ १५ की १६ जणांचा असेल, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
मुरली विजय, शिखर धवन, कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, अ संघाचा कर्णधार चेतेश्वर पुजारा यांची निवड निश्चित असेल. युवा के. एल. राहुल सातवा फलंदाज असेल. आजारामुळे तो बांगला देश दौऱ्यावर जाऊ शकला नव्हता. वृद्धिमान साहा हा यष्टिरक्षकासाठी पहिली पसंती राहील. नमन ओझा किंवा संजू सॅमसन यांचीही वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. संघात वेगवान गोलंदाज उमेश यादव, इशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार तसेच वरुण अॅरॉन फिट असेल तर त्यांचीही निवड होईल. दोन आॅफस्पिनर आर. अश्विन आणि हरभजनसिंग यांचे स्थान अबाधित असेल. तिसरा फिरकी गोलंदाज या नात्याने अक्षर पटेल की अमित मिश्रा यापैकी कुणाला संधी दिली जाईल, याबद्दल उत्सुकता आहे. रवींद्र जडेजा याला खराब फॉर्ममुळे तसेच प्रग्यान ओझाला गोलंदाजीच्या संशयित शैलीमुळे बाहेर ठेवले जाईल.