टीम इंडियाच्या सुरक्षेत वाढ

By Admin | Updated: December 16, 2014 00:09 IST2014-12-16T00:09:34+5:302014-12-16T00:09:34+5:30

सिडनीत हल्ल्याच्या पार्श्वभूमीवार आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Team India's security increase | टीम इंडियाच्या सुरक्षेत वाढ

टीम इंडियाच्या सुरक्षेत वाढ

 नवी दिल्ली : सिडनीत हल्ल्याच्या पार्श्वभूमीवार आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बीसीसीआयचे सचिव संजय पटेल म्हणाले,‘आम्ही क्रिकेट आॅस्ट्रेलियाच्या उच्चाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. सर्व खेळाडू सध्या ब्रिस्बेन येथे आहेत. त्यांची सुरक्षा सर्वतोपरी असल्याने सुरक्षेत वाढ करण्यात आली. सर्वच खेळाडू पोलिसांच्या गराड्यात आहेत. आम्ही सीएच्या व्यवस्थेवर समाधानी आहोत.’ दुसरी कसोटी बुधवारपासून ब्रिस्बेन येथे सुरू होत आहे. ६ जानेवारीपासून सिडनीत सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीवर या घटनेचा परिणाम जाणवेल का, असे विचारताच पटेल म्हणाले,‘इतक्या लवकर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. पुढची कसोटी ब्रिस्बेन येथे आहे. सिडनी कसोटीला बराच वेळ आहे. खेळाडूंची सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.’ (वृत्तसंस्था)

Web Title: Team India's security increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.