शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
3
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
4
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
5
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
6
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
7
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
8
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
9
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
10
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
11
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
12
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
13
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
14
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
15
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
16
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
17
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
18
MSRTC: ...तरच जेष्ठ नागरिकांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, नियमात बदल!
19
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
20
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक

गती, रणनीती अन् कमालीचं कसब! भारतीय महिला संघानं जिंकली पहिली वहिली खो-खो वर्ल्ड कप स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 20:14 IST

कर्णधार प्रियांका इंगळेसह अन्य खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरीचा नजराणा पेश करत पहिली वहिली वर्ल्ड कप स्पर्धा गाजवलीये. 

कमालीची गती अन् चपळाईसह योग्य रणनीतीचं कसब दाखवून देत भारतीय महिला संघानं खो खो क्रीडा स्पर्धेतील पहिली वहिली वर्ल्ड स्पर्धा जिंकली आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर रंगलेल्या फायनल लढतीत भारतीय संघानं नेपाळला शह देत वर्ल्ड कप वर आपलं नाव कोरलं. भारतीय महिला  संघानं सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपला दबदबा कायम राखत अंतिम लढत ७८-४० अशा फरकाने जिंकत पहिल्या वहिल्या वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. कर्णधार प्रियांका इंगळेसह अन्य खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरीचा नजराणा पेश करत पहिली वहिली वर्ल्ड कप स्पर्धा गाजवलीये. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

भारतीय संघानं वर्ल्ड कप स्पर्धेत एकही सामना नाही गमावला

भारतीय महिला संघानं सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ६६-१६ असा धुव्वा उडवत फायनल गाठली होती. पहिल्या वहिल्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय महिला संघाने सुरुवातीपासूनच आपला जलवा दाखवला. स्पर्धेतील एकही सामना न गमावता महिला ब्रिगेडनं पहिल्या वहिल्या वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरत नवा इतिहास रचला आहे.

पहिल्या हाफमध्ये आघाडी

अंतिम सामन्यात नेपाळच्या संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा बचाव करण्याला पसंती दिली. पहिल्या फेरीत भारतीय महिला खो खो संघआनं ३४ गुण मिळवत विजयाचा पाया रचला. दुसऱ्या फेरीत नेपाळनं आक्रमण करताना २४ गुण मिळवले. हाफ टाइममध्ये भारतीय महिला संघाने सामन्यात ३५-२४ अशी आघाडी घेतली होती. तिसऱ्या फेरीत भारतीय महिला खो खो संघाने ३८ गुण मिळवत सामन्यावरील पकड आणखी मजबूत केली. तिसऱ्या फेरीनंतर स्कोअर लाइन ७३-२४ अशी होती. पण अखेरच्या टप्प्यात नेपाळच्या संघाने सर्वोत्तम खेळ दाखवत १६ गुण मिळवले. या फेरीत भारतीय महिला संघाने आपल्या खात्यात ५ गुण जमा करत फायनल लढत ७८-४० अशी आपल्या नावे करत इतिहास रचला. 

भारतीय महिला खो खो संघाचा फायनलपर्यंतचा दिमाखदार प्रवास

खो खो वर्ल्ड कप स्पर्धेत फक्त नेपाळचा संघच असा होता ज्या संघाविरुद्ध भारतीय संघाने  ५० गुणांपेक्षा पेक्षा कमी अंतराने विजय नोंदवला. या स्पर्धेत एकूण १९ संघ सहभागी झाले होते. भारतीय महिला संघ  इराण, मलेशिया आणि दक्षिण कोरिया या संघांसह 'अ' गटात होता. साखळी फेरीतल दक्षिण कोरिया विरुद्ध भारतीय संघाने १७६-१८ असा मोठा विजय मिळवला होता. त्यानंतर इराण विरुद्ध महिला ब्रिगेडनं १००-१६ आणि मलेशियाविरुद्ध १००-२० अशा फरकाने विजय नोंदवल्याचे पाहायला मिळाले. क्वार्टर फायनलमध्ये बांगालेदेळा १०९-१६ अशा फरकाने पराभूत केल्यावर सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला ६६-१६ मात देत भारतीय महिला संघाने फायनल गाठली होती.

टॅग्स :Kho-Khoखो-खोIndiaभारतTeam Indiaभारतीय क्रिकेट संघNepalनेपाळ