वन-डे रँकिंगमध्ये टीम इंडिया पुन्हा नंबर वन
By Admin | Updated: September 2, 2014 02:50 IST2014-09-02T02:50:07+5:302014-09-02T02:50:07+5:30
टीम इंडियाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ताज्या क्रमवारीत अव्वल क्रमांकावर ङोप घेतली आह़े

वन-डे रँकिंगमध्ये टीम इंडिया पुन्हा नंबर वन
नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या वन-डे मालिकेत 2-क् ने आघाडी मिळविणा:या टीम इंडियाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ताज्या क्रमवारीत अव्वल क्रमांकावर ङोप घेतली आह़े यामुळे दक्षिण आफ्रिकेची दुस:या क्रमांकावर घसरण झाली आह़े
आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या वन-डे रँकिंगमध्ये भारताने 114 गुण मिळविताना अव्वल क्रमांकावर ताबा मिळविला़ दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात 113 गुण जमा आहेत़ हा संघ दुस:या क्रमांकावर फेकला गेला आहे,
तर श्रीलंका संघ
111 गुणांसह तिस:या स्थानावर विराजमान आह़े
रविवारी झालेल्या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियाला ङिाम्बाब्वेकडून मात खावी लागली होती़ यामुळे ऑस्ट्रेलिया संघ ताज्या क्रमवारीत 111 गुणांसह चौथ्या क्रमांकावर पोहोचला आह़े
लंका आणि ऑस्ट्रेलियाचे गुण समान असले तरी दशांश गुणांच्या आधारे लंका संघाची बाजू वरचढ आह़े दरम्यान, ऑस्ट्रेलियावरील विजयामुळे ङिाम्बाब्वे संघ 1क्व्या क्रमांकावर पोहोचला आह़े
भारतीय संघाला आपला अव्वलचा ताज कायम राखण्यासाठी इंग्लंडविरुद्धचे दोन्ही वन-डे सामने जिंकावे लागणार आहेत, तसेच अन्य संघांच्या सामन्यातील परिणामामुळेही भारताच्या रँकिंगवर परिणाम होऊ
शकतो़ इंग्लंडने जर पुढच्या
दोन्ही वन-डेत भारतावर विजय मिळविला आणि हरारेत सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले, तर कांगारू संघ पुन्हा आयसीसीच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान होईल़ (वृत्तसंस्था)
1़ भारत, 2़ दक्षिण आफ्रिका,
3़ श्रीलंका, 4़ ऑस्ट्रेलिया, 5़ इंग्लंड, 6़ पाकिस्तान, 7़ न्यूझीलंड, 8़ वेस्ट इंडीज, 9़ बांगलादेश, 1क़् ङिाम्बाब्वे, 11़ अफगाणिस्तान व 12़ आर्यलड़