T-20 मध्ये टीम इंडिया नंबर वन
By Admin | Updated: January 31, 2016 19:37 IST2016-01-31T19:23:46+5:302016-01-31T19:37:14+5:30
भारताने ऑस्ट्रेलियाला व्हाइट वॉश दिल्यामुळे रेटींग गुणात भारताने नंबर एकवर असलेल्या वेस्ट इंडीजला पच्छाडले

T-20 मध्ये टीम इंडिया नंबर वन
ऑनलाइन लोकमत
सीडनी, दि. ३१ - तिसऱ्या आणि आखेरच्या T-20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ७ गडी राखून विजय
मिळवत ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियातच व्हाईट वॉश देण्याचा पराक्रम आज भारताने केला. आताच आयसीसीने जाहीर केलेल्या T-20 संघाच्या रँकीगमध्ये भारताने प्रथम क्रमांकावर गरुडझेफ घेतली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिका सुरु होण्यापुर्वी भारत T-20 रँकीकमध्ये कसोटी खेळणाऱ्या देशात सर्वात शेवटच्या ८ व्या स्थानी होता. भारताने ऑस्ट्रेलियाला व्हाइट वॉश दिल्यामुळे रेटींग गुणात भारताने नंबर एकवर असलेल्या वेस्ट इंडीजला पच्छाडले आणि क्रमांक एकचे स्थान काबिज केले.
९ फेब्रुवारीपासून मायदेशात श्रीलंकेविरुद्ध ३ T20 सामन्याची मालिका भारत खेळणार आहे. श्रीलंकेविरुद्ध भारताने विजयी अभीयान कायम राखले तर भारताचे शिर्ष स्थान कायम राहिल . १२० गुणासह भारत प्रथम, ११८ वेस्ट इंडीज, ११८ श्रीलंका.
सध्या भारत कसोटी मध्ये प्रथम क्रमांकावर आहे. तर एकदिवसीय संघात दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे.