टीम इंडियाने केला कसून सराव

By Admin | Updated: June 9, 2015 06:33 IST2015-06-09T06:33:33+5:302015-06-09T06:33:33+5:30

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ येथे दाखल झाला. पहिल्याच दिवशी त्यांनी शेर ए बांगला स्टेडियमवर सराव केला.

Team India has done a lot of practice | टीम इंडियाने केला कसून सराव

टीम इंडियाने केला कसून सराव

>बांगलादेश दौरा : पहिल्याच दिवशी कोहली अॅण्ड कंपनी विश्रंती न घेता मैदानावर
 
मीरपूर : बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ येथे दाखल झाला. पहिल्याच दिवशी त्यांनी शेर ए बांगला स्टेडियमवर सराव केला. संघाने दोन तास ‘नेट प्रॅक्टीस’ केली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सकाळच्या विमानाने बांगलादेशात पोहचला. दुपारी त्यांनी नेटमध्ये घाम गाळला. 
भारत आणि बांगलादेश यांच्यात बुधवारपासून एकमेव कसोटी सामन्याला सुरुवात होईल. त्यानंतर 
ते तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळतील. बीसीसीआयचे प्रशासकीय व्यवस्थापक विश्वरूप 
डे म्हणाले, येथे पोहचताच खेळाडूंनी सराव करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी नेटमध्ये सराव केला. दुसरीकडे, बांगलादेश संघ फतुल्लाह येथे सराव करीत आहे. 
नवनियुक्त कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 14 सदस्यांचा भारतीय संघ फातुल्लामध्ये 1क् जूनपासून एकमेव कसोटी सामना खेळणार आहे, तर कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ तीन वन-डे सामन्यांची मालिका ढाका येथे खेळेल. 
भारतीय संघ कोलकाता येथे दोन दिवसांच्या सराव शिबिरानंतर मालिकेसाठी थेट ढाका येथे पोहोचला आहे. तीन वन-डे सामने मिरपूरमध्ये 18, 21 व 24 जून रोजी खेळले जाणार आहेत. 
धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर विराट पूर्णकालीन कसोटी कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व करेल, ही या मालिकेची विशेष बाब आहे. दिग्गज ऑफस्पिनर हरभजनसिंगच्या पुनरागमनावर सर्वाची नजर आहे.
बांगलादेशाविरुद्ध गेल्या 15 वर्षात भारतीय संघासाठी हा सर्वात कठीण दौरा असल्याचे मानले जात आहे. यजमान संघ 
फॉर्मात असून, त्यांनी अलीकडेच पाकिस्तानसारख्या बलाढय़ संघाविरुद्ध वन-डे मालिकेत प्रथमच 3-क् असा विजय मिळविला. याव्यतिरिक्त टी-2क् मालिकाही जिंकली. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत संघर्षपूर्ण खेळ केल्यानंतर बांगलादेशाला 1-क्ने पराभव स्वीकारावा लागला.   (वृत्तसंस्था)
 
> 2007 मध्ये भारताने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-क् ने विजय मिळवला, तर 2क्क्9-1क्मध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-क् ने जिंकली. उभय संघांदरम्यान यापूर्वी अखेरची लढत यंदा ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळल्या गेलेल्या विश्वकप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत झाली होती. त्यात भारताने विजय मिळविला होता. 
> संघातील सर्व 14 खेळाडू फिट आहेत. कोलकात्यामध्ये अखेरच्या सराव सत्रदरम्यान रिद्धिमान साहाच्या छातीवर चेंडू आदळला होता; पण तो आता फिट आहे. त्याने आज सराव केला. 
> भारतीय संघाने सोमवारी कसून सराव केला. बीसीसीआयचे प्रशासकीय व्यवस्थापक विश्वरूप डे म्हणाले, ‘‘येथे दाखल झाल्यानंतर भारतीय खेळाडू सराव करण्यास उत्सुक होते. त्यामुळे शेरे-ए-बांगला स्टेडियममध्ये सराव करण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण बांगलादेश संघ फतुल्लामध्ये सराव करीत होता. मंगळवारी आम्ही फतुल्लामध्ये सराव करू. भारतीय संघ ढाका शहरात थांबला असून, येथून नारायणगंज जिल्ह्यातील फतुल्ला जवळजवळ दीड तास अंतरावर आहे. त्यामुळे आम्ही येथेच सराव करण्याचा निर्णय घेतला.’’
 
> भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सावधगिरी बाळगताना बांगलादेशाला रवाना होण्यापूर्वी कसोटी संघासाठी कोलकात्यामध्ये फिटनेस शिबिराचे आयोजन केले होते, त्या वेळी सर्व खेळाडूंना फिटनेस चाचणीला सामोरे जावे लागले. यापूर्वी केवळ दुखापतीतून सावरलेला खेळाडूंना फिटनेस चाचणी द्यावी लागत होती. कर्नाटकाचा फलंदाज लोकेश राहुलला डेंग्यूमुळे मालिकेतून माघार घ्यावी लागली. त्याच्या स्थानी अद्याप पर्यायी खेळाडूच्या नावाची घोषणा झालेली नाही. 
 
दोन वर्षाच्या कालावधीनंतर अनुभवी ऑफस्पिनर हरभजनसिंगला कसोटी संघात संधी मिळाली आहे. हरभजनने हैदराबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. हरभजनला वगळण्यात आल्यानंतर रवींद्र जडेजाला संघात स्थान मिळाले होते. 
 
भारताने बांगलादेशाविरुद्ध 7 कसोटी सामने खेळले असून, त्यांपैकी 6 सामन्यांत भारतीय संघाने विजय मिळविला आहे. एक कसोटी सामना अनिर्णीत संपला होता. उभय संघांदरम्यान यापूर्वी जानेवारी 2क्1क्मध्ये मिरपूर येथे अखेरचा कसोटी सामना खेळला होता. भारताने त्या लढतीत 1क् गडी राखून विजय मिळविला होता.
 
भारताने 2000-01मध्ये प्रथमच बांगलादेशाचा दौरा केला होता, त्या वेळी बांगलादेशाला कसोटी संघाचा दर्जा मिळाला होता. भारतीय संघाने त्यानंतर 2क्क्9-1क्र्पयत चार वेळा बांगलादेशाचा दौरा केला. या कालावधीत भारताने 7 सामने खेळले. भारताने 2000-01मध्ये एकमेव कसोटी सामना जिंकला होता, तर 2004-05मध्ये 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 असा विजय मिळविला होता. 
 
भारताविरुद्ध तीन गोलंदाजांची रणनीती यशस्वी ठरणार नाही : स्ट्रिक
ढाका : बांगलादेशाचे गोलंदाजी प्रशिक्षक हीथ स्ट्रिक यांनी भारताविरुद्धच्या मालिकेसाठी रुबेल हुसेन व मोहंमद शाहीद यांचा संघात समावेश करण्यात आल्याच्या निर्णयाचे स्वागत केले; पण या मालिकेत तीन वेगवान गोलंदाजांसह खेळण्याची रणनीती उपयुक्त ठरणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. ङिाम्बाब्वेचे माजी अष्टपैलू खेळाडू स्ट्रिक म्हणाले, ‘‘येथील खेळपट्टय़ांचे स्वरूप बघितल्यानंतर संघात तीन वेगवान गोलंदाजांना संधी देण्याचा लाभ होणार नाही. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज निष्प्रभ ठरले आहेत.’’
 
 
भारताला हरवण्याची क्षमता : मुशफिकुर
फातुल्ला : पाकिस्तानविरुद्ध नुकत्याच संपलेल्या मालिकेतील कामगिरीमुळे संघाचे मनोधैर्य उंचावले असून, बांगलादेश संघात भारताचा पराभव करण्याची क्षमता आहे, असे मत बांगलादेश संघाचा कसोटी कर्णधार मुशफिकुर रहिमने व्यक्त केले. 1क् जूनपासून प्रारंभ होणा:या कसोटी सामन्यापूर्वी यजमान संघाच्या कर्णधाराने पाहुण्या संघावर दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न करताना सांगितले की, भारताविरुद्ध खेळणो नेहमी प्रेरणादायक असते. जगभर या मालिकेची चर्चा होणार आहे. ज्या वेळी आम्ही पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत विजय मिळविला, त्या वेळी जगभरात आमच्या प्रतिभेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. भारताविरुद्धच्या मालिकेच्या निमित्ताने पाकिस्तानविरुद्ध 3-क् ने मिळविलेला मालिका विजय केवळ योगायोग नसल्याचे सिद्ध करण्याची संधी प्राप्त झाली आहे.’’
 
 
लिट्टन यष्टिरक्षकाची भूमिका बजावण्याची शक्यता
ढाका : कर्णधार मुशफिकुर रहीमच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे भारताविरुद्ध खेळल्या जाणा:या एकमेव कसोटी सामन्यासाठी लिट्टन दास बांगलादेश संघात यष्टिरक्षकाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानविरुद्ध एप्रिल महिन्यात खुलना कसोटी सामन्यादरम्यान रहीमच्या बोटाला दुखापत झाली होती. दुखापतीनंतरही रहीमने नेटमध्ये सराव केला. लिट्टन यष्टिरक्षणाचा सराव करीत होता. बांगलादेशाच्या अंतिम 11 खेळाडूंमध्ये कर्णधार व फलंदाज म्हणून रहीमचे स्थान निश्चित आहे. पण, लिट्टनला यष्टिरक्षकाची भूमिका बजावावी लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 
मुशफिकुर रहिमने 2007मध्ये यष्टिरक्षकाची जबाबदारी सांभाळल्यानंतर 2क् वर्षीय लिट्टन राष्ट्रीय संघातर्फे यष्टिरक्षकाची भूमिका बजावणारा पहिला खेळाडू ठरू शकतो. पाकिस्तानविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात ङोल सोडल्यानंतर रहीम यष्टींमागे संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. 
 

Web Title: Team India has done a lot of practice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.