टीम इंडिया फुटबॉल प्रेमात!
By Admin | Updated: August 6, 2014 01:36 IST2014-08-06T01:36:49+5:302014-08-06T01:36:49+5:30
मँचेस्टर शहरात ‘लाल’ रंगाचे अस्तित्व प्रकर्षाने जाणवते. कारणही तसेच आहे.

टीम इंडिया फुटबॉल प्रेमात!
अजय नायडू
मँचेस्टर शहरात ‘लाल’ रंगाचे अस्तित्व प्रकर्षाने जाणवते. कारणही तसेच आहे. इंग्लंडमधील सर्वात लोकप्रिय मँचेस्टर युनायटेड आणि मँचेस्टर सिटीहे दोन्ही क्लब याच शहरात आहेत. मँचेस्टर युनायटेडला तर प्रदीर्घ इतिहास आहे. हा क्लब 1क्क् वर्षे जुना आहे. त्याला ‘रेड डेव्हिल्स’(लाल सैतान) नावाने संबोधतात. जेव्हा हे दोन्ही क्लब आमनेसामने ठाकतात, तेव्हा स्थानिकांची प्रचंड गर्दी उसळते.
लाल रंग हा ‘रेड डेव्हिल्स’चे प्रतीक आहे आणि जेव्हाही मँचेस्टर युनायटेड विजयी होतो, तेव्हा त्यांचे चाहते अंगावर लाल रंग चढवून रात्रभर जल्लोष करीत असतात. असाच काहीसा प्रकार रविवारी येथे झाला. सायंकाळी भारतीय क्रिकेट संघाने आपल्या अभ्यास दौ:यात या क्लबला भेट दिली. तेव्हाही येथे जल्लोष झाला. मियामी येथे प्रिमीयर लीगमध्ये मँचेस्टर युनायटेडने लिव्हरपूलचा 3-1ने पराभव करीत आंतरराष्ट्रीय चॅम्पियन क्लबचा मान मिळवला.
या विजयाचा आनंदही चाहत्यांनी ‘रेड डेव्हिल्स स्टाईल’मध्ये रेस्टॉरंट, पब, बारमध्ये रात्रीचा दिवस करून लुटला. इंग्लंडने भारताविरुद्ध मालिकेत बरोबरी साधली आहे. मँचेस्टरमध्ये इंग्लंडची बाजू वरचढ दिसत आहे. त्यामुळे क्रिकेट सामन्यालाही असाच रंग चढलाय. गुरुवारी होणा:या या सामन्यापूर्वी चर्चा रंगतेय, ती केवळ मँचेस्टर युनायटेडच्या विजयाची. भारताप्रमाणोच क्रिकेटवेडय़ा असलेल्या या देशात फुटबॉलचे इतके वेड असेल, हे थोडे आश्चर्यकारकच म्हणावे लागेल. ओल्ड ट्रॅफोर्ड क्रिकेट स्टेडियमच्या काही मीटर अंतरावरच इंग्लंडमधील या लोकप्रिय क्लबचे हे स्टेडियम आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार, रिअल माद्रीद हा जगातील सर्वात श्रीमंत क्लब आहे, ज्याची व्हॅल्यू 3.44 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे. त्यानंतर दुस:या क्रमांकावर बार्सिलोना (3.22 अब्ज अमेरिकन डॉलर) आणि तिस:या क्रमांकावर मँचेस्टर युनायटेड (2.81अब्ज अमेरिकन डॉलर) होता.
जुलै 2क्14मध्ये त्यांचा आदिदासशी करार झालाय. त्यामुळे त्यांची ब्रँड व्हॅल्यू वाढली असून, हा क्लब आता जगातील सर्वात श्रीमंत क्लब झालाय.
4भारतीय क्रिकेट संघात फुटबॉलचे तसे मोजकेच चाहते आहे. त्यात कर्णधार महेंद्रसिंह धोनी मँचेस्टर युनायटेडचा तगडा चाहता. तीन दिवसांच्या ब्रेकमध्ये धोनी आणि संघ साथीदारांनी रविवार अविस्मरणीय बनवला. त्यांनी क्लबच्या स्टेडियमला भेट दिली.
4प्रवेशद्वारावरच येताच त्यांना नवनियुक्त प्रशिक्षक लुईस वान गाल, वेन रुनी आणि रॉबिन व्ॉन पर्सी या खेळाडूंची भली मोठी पोस्टर्स दिसली. 67 हजार प्रेक्षक क्षमतेच्या स्टेडियममध्ये भारतीय संघाने जेव्हा ‘एन्ट्री’ केली, तेव्हाधोनीसह अनेकांना भरगच्च स्टेडियमचा ‘थ्रील’ आला.
4धोनीला आपल्या शालेय दिवसाची आठवण आली असेल. भारतीय टीमने क्लबच्या ड्रेसिंग रूमला भेट दिली, तर काहींनी जर्सीस आणि कॅप्स खरेदी केल्या.