दमाणी, नागनाथ, शेटफळ विद्यालयाचे संघ प्रथम

By Admin | Updated: August 7, 2015 00:06 IST2015-08-07T00:06:56+5:302015-08-07T00:06:56+5:30

सोलापूर: सोलापूर जिल्हा टग ऑफ वॉर (रस्सीखेच) संघटनेच्या वतीने हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर आयोजित जिल्हास्तरीय मिनी सब ज्युनियर १३ वर्षांखालील व सब ज्युनियर १७ वर्षांखालील मुलींची टग ऑफ वॉर (रस्सीखेच) अजिंक्यपद स्पर्धा व निवड चाचणी स्पर्धेत दमाणी हायस्कूूल, मोहोळचे नागनाथ विद्यालय आणि माध्यमिक शेटफळच्या संघांनी प्रथम क्रमांक पटकावला़

Team of Damani, Nagnath, Shetfal School first | दमाणी, नागनाथ, शेटफळ विद्यालयाचे संघ प्रथम

दमाणी, नागनाथ, शेटफळ विद्यालयाचे संघ प्रथम

लापूर: सोलापूर जिल्हा टग ऑफ वॉर (रस्सीखेच) संघटनेच्या वतीने हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर आयोजित जिल्हास्तरीय मिनी सब ज्युनियर १३ वर्षांखालील व सब ज्युनियर १७ वर्षांखालील मुलींची टग ऑफ वॉर (रस्सीखेच) अजिंक्यपद स्पर्धा व निवड चाचणी स्पर्धेत दमाणी हायस्कूूल, मोहोळचे नागनाथ विद्यालय आणि माध्यमिक शेटफळच्या संघांनी प्रथम क्रमांक पटकावला़
या स्पर्धेत १० संघांनी भाग घेतला होता़ मिनी सब ज्युनियर १३ वर्षांखालील २८० किलो वजनी गटात दमाणी प्रशालेचा संघ विजयी झाला़ द्वितीय एस़ आऱ चंडक प्रशाला तर पी़एस़ इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला़
सब ज्युनियर १७ वर्षांखालील ४०० किलो वजनी गटात माध्यमिक हायस्कूल शेटफळने प्रथम, एस़ आऱ चंडक हायस्कूलला पुढे चाल मिळाल्याने द्वितीय क्रमांक तर पी़ एस़ इंग्लिश मीडियम स्कूलने तृतीय क्रमांक पटकावला़
४२० किलो वजनी गटात मोहोळच्या नागनाथ विद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला़ दमाणी प्रशालेचा संघ द्वितीय तर एस़ आऱ चंडक हायस्कूलने तृतीय क्रमांक पटकावला़
दरम्यान, शरदचंद्र पवार प्रशालेत तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे़ या स्पर्धेचे उद्घाटन विक्रीकर अधिकारी सचिन काळे यांच्या हस्ते झाले़ यावेळी सोलापूर जिल्हा रस्सीखेच संघटनेचे अध्यक्ष दशरथ कोलारकर, सचिव शीतलकुमार शिंदे, द्रुपेश लवटे, आरती काकडे, नेहा चव्हाण उपस्थित होते़ यासाठी नीलेश दहीहंडे, धनाजी लवटे, गणेश जोरवर, अजित तुपसमिंदर यांनी परिश्रम घेतले़ (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Team of Damani, Nagnath, Shetfal School first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.