शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
2
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
3
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
5
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
6
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
7
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
9
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
10
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
11
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
12
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
13
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
14
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
15
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
16
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
17
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
18
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
19
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
20
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल

Good News : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पदकाची हुलकावणी मिळालेल्या भारतीय खेळाडूंना मिळणार Tata Altroz!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 15:18 IST

Tokyo Olympics 2020 : ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात मोठं पथक घेऊन टोकियोत दाखल झालेल्या भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली.

 Tokyo Olympics 2020 : ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात मोठं पथक घेऊन टोकियोत दाखल झालेल्या भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली. ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक ७ ( १ सुवर्ण, २ रौप्य व ४ कांस्य) पदकांची कमाई केली. भालाफेकपटू नीरज चोप्रानं सुवर्ण, वेटलिफ्टर मीराबाई चानू व कुस्तीपटू रवी कुमार दहिया यांनी रौप्य, बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू, बॉक्सर लवलिना बोरगोईन, कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पुरूष हॉकी संघ यांनी कांस्यपदकाची कमाई केली. पण, यांच्याव्यतिरिक्त महिला हॉकी संघ, गोल्फपटू अदिती अशोक, कुस्तीपटू दीपक पूनिया यांना पदकानं थोडक्यात हुलकावणी दिली.

भारताला पदक जिंकून देणाऱ्या खेळाडूंवर कोट्यवधींच्या बक्षीसांचा पाऊस पडत आहे, नोकरीत बढती मिळत आहे. सेलिब्रेटिंकडून कौतुक होत आहे. पण, ज्या खेळाडूंनी पदक नाही पटकावले, परंतु त्यांच्या कामगिरीची साऱ्या जगानं दखल घेतली अशा भारतीय खेळाडूंना आता Tata Altroz ही आलीशान गाडी गिफ्ट म्हणून मिळणार आहे. टाटा मोटर्सनं तशी घोषणा केली आहे. या खेळाडूंमध्ये गोल्फटपू अदिती, कुस्तीपटू दीपक आणि महिला हॉकी संघाचा समावेश आहे. भारतीय महिला हॉकी संघानं चौथे स्थान पटकावताना ऑलिम्पिकमधील १९८०नंतरची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. '

'या खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करताना कडवी टक्कर दिली आणि त्यांच्या जिगरबाज खेळीनं देशातील अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा मिळाली आहे. आपले काही खेळाडू पोडियमच्या अगदी जवळ पोहोचले होते. त्यांना पदकानं हुलकावणी दिली असली तरी त्यांच्या खेळानं लाखो भारतीयांची मनं जिंकली आणि उदयोन्मुख खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण केला,''असे टाटा मोटर्सच्या पँसेंजर व्हेडिकल बिजनसचे अध्यक्ष शैलेंद्र चंद्रा यांनी सांगितले.   

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021TataटाटाHockeyहॉकीWrestlingकुस्ती