मनोहर यांची, शहरयार, क्लार्क यांच्याशी चर्चा
By Admin | Updated: November 23, 2015 00:30 IST2015-11-23T00:30:57+5:302015-11-23T00:30:57+5:30
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील डिसेंबरमध्ये होणाऱ्या संभाव्य क्रिकेट मालिकेबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि आयसीसी चेअरमन शशांक मनोहर यांनी आज आयसीसी

मनोहर यांची, शहरयार, क्लार्क यांच्याशी चर्चा
दुबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील डिसेंबरमध्ये होणाऱ्या संभाव्य क्रिकेट मालिकेबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि आयसीसी चेअरमन शशांक मनोहर यांनी आज आयसीसी मुख्यालयात पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे प्रमुख शहरयार खान यांच्याशी चर्चा केली. इंग्लंड क्रिकेट बोर्डचे आणि पाकिस्तान टास्क फोर्सचे चेअरमन जाईल्स क्लार्क तसेच पीसीबीचे अधिकारी नजम सेठी हे सुध्दा यावेळी उपस्थित होते.
द्विपक्षीय मालिकेबाबत अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या या चर्चेच्या तपशीलाबाबत मात्र अत्यंत गुप्तता पाळण्यात आली. नजम सेठी यांनी यानंतर एक टिवट केले. त्यात म्हंटले आहे की, बीसीसीआय आणि पीसीबीच्या अधिकांऱ्याची मुख्यालयात उपयुक्त चर्चा झाली. या बैठकीत उपस्थित असलेले क्लार्क हे याबाबतच्या प्रश्नांना उत्तरे देतील. (वृत्तसंस्था)