माझ्या निवृत्तीची चर्चा चुकीची : क्लार्क

By Admin | Updated: August 5, 2015 23:40 IST2015-08-05T23:40:21+5:302015-08-05T23:40:21+5:30

सूर गवसण्यासाठी संघर्ष करणारा आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कने इंग्लंडविरुद्ध अ‍ॅशेस मालिकेनंतरही खेळणे पुढे चालू ठेवणार असल्याचे जाहीर करताना

Talk about my retirement is wrong: Clarke | माझ्या निवृत्तीची चर्चा चुकीची : क्लार्क

माझ्या निवृत्तीची चर्चा चुकीची : क्लार्क

सिडनी : सूर गवसण्यासाठी संघर्ष करणारा आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कने इंग्लंडविरुद्ध अ‍ॅशेस मालिकेनंतरही खेळणे पुढे चालू ठेवणार असल्याचे जाहीर करताना आपल्याविषयी जे बोलले जात आहे ते सर्व आधारहीन असल्याचे म्हटले आहे.
विद्यमान अ‍ॅशेज मालिकेतील ६ डावांत अवघ्या ९४ धावा करणाऱ्या क्लार्कवर कामगिरी उंचावण्याचा दबाव आहे. आॅस्ट्रेलियन मीडियाने तर क्लार्कच्या कारकीर्दीचा शेवट होत आला आहे आणि हे त्याला माहीत आहे, तसेच त्याच्यात चांगल्या कामगिरीची जिद्द संपली असल्याचेही म्हटले आहे.
याविषयी क्लार्क म्हणाला, ‘‘माझ्या खेळाविषयी सध्या सुरू असलेली टीका योग्य आहे. विशेषत: मी संघाचा कर्णधार आहे; परंतु काही जणांनी माझ्यातील धावांची भूक संपली असल्याचे लिहिले आहे. काही जणांनी तर या मालिकेनंतर माझी कारकीर्द संपली आहे आणि हे मला माझ्या डोळ्यांनी दिसत असल्याचे लिहिले आहे. हे सर्व काही आधारहीन आहे.’’ क्लार्क म्हणाला, ‘‘माझ्या कामगिरीविषयी टीका केली जाऊ शकते; परंतु हा महान खेळ खेळण्याच्या माझ्या इच्छेविषयी प्रश्न निर्माण करणे चुकीचे आहे. आजही सरावासाठी सर्वात आधी मी उतरतो आणि सर्वात शेवटी मी तेथून निघतो.’’

Web Title: Talk about my retirement is wrong: Clarke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.